बुलढाणा

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची हिवरखेड येथील पत्रकारांची मागणी

प्रतिनिधी :-
आकोट हिवरखेड जळगाव जामोद राज्यमार्गावरील (हिवरखेड आणि खंडाळा फाटा) या दोन रखडलेल्या पुलाच्या कामामुळे अनेकदा राज्यमार्ग बंद पडत असून अनेक अपघात होत आहेत यामध्ये एका आदिवासी युवकाला प्राण सुद्धा गमवावे लागले. त्याची नोंद हिवरखेड पोलीस स्टेशनला आहे. या पुलाच्या वस्तुनिष्ठ बातम्या प्रामाणिकपणे पत्रकाराने लावली असता त्या पुलाचे बांधकाम करणाऱ्या सबंधित मुजोर व उद्धट ठेकेदाराने वास्तविक बातमी प्रकाशित करणाऱ्या पत्रकाराला भ्रमध्वनीवरून आणि प्रत्यक्ष पुला जवळ बोलावून अत्यंत अश्लील शिवीगाळ केली आणि गंभीर स्वरूपाच्या धमक्या दिल्या. तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची सुद्धा धमकी दिली. त्यामुळे या घटनेचा हिवरखेड येथील सर्व पत्रकार बांधवानच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. व संबंधित मुजोर ठेकेदाराविरुद्ध पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच आदिवासी युवकाच्या मृत्यूसाठी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा
यासाठी हिवरखेड पोलीस स्टेशन येथे पत्रकार बंधूंमार्फत निवेदन देण्यात आले. सदर निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ स्तरावर सुद्धा देण्यात येणार आहेत.
आता पोलीस आणि प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग कडून या उद्धट ठेकेदारावर कोणती कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवेदन देण्यासाठी संदीप इंगळे, किरण सेदानी, महेंद्र कराळे, मनीष भुडके, गणेश सुरजोशी, सतीश इंगळे, रितेश टिलावत, संतोष राऊत, राजेश पांडव, सुरज चौबे, , जितेश कारिया, अर्जुन खिरोडकार, राहुल गिऱ्हे, बाळासाहेब नेरकर, गजानन राठोड, जितेंद्र लाखोटिया, अनिल कवळकार, सुनील बजाज, शाहरुख लाला, जमीर शेख, प्रदीप पाटील, जावेद खान, शहजाद खान, फारूक सौदागर उमर बेग मिर्झा यांच्यासह हिवरखेडचे बहुतांश पत्रकार बंधू उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button