उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाची होत आहे गैर सोय भर उन्हाळ्यामध्ये पाण्या पासून राहावे लागत आहे वंचित


स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
स्थानिक प्रतिनिधी – मुक्ताईनगर

मुक्ताईनगर तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये गरोदर महिलांची पिण्याचे पाणी नसल्याने आरोग्याचा प्रश्न उपजिल्हा रुग्णालयामध्ये निर्माण झालेला आहे. मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालय यांच्या अधिकृत कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यावरती कुठल्याही प्रकारचे त्यांनी उत्तरे दिले नाही.नुकतेच जन्म घेतलेल्या नवजात बालकांना सुद्धा त्रासाला समोरे जावं लागत आहे अशी दैनंदिय अवस्था उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथील झालेली रुग्णांची दिसून येते, तसेच
सुलभ स्वच्छालयासाठी सुद्धा पाणी नाही. त्यामुळे महिलांची अजूनच दमकुंडी झाल्याचे भरती असलेल्या महिला रुग्णांने माहिती दिली.
रुग्णालयातील परिचारिका यांना विचारपूस केली असता योग्य ती माहिती त्यांनी दिली नाही. यासंदर्भात माझ्याजवळ माहिती नाही असे उत्तर देऊन टाळाटाळ करण्यात आले .
प्रशासन नेमकं करते तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला निर्माण झालेला आहे.
मुक्ताईनगर मध्ये दोन भाऊ एक ताई असताना देखील उपजिल्हा रुग्णालयामध्ये अशा प्रकारची रुग्णांची अवस्था होत आहे ही खूप खेदाची बाब आहे व प्रशासन देखील याकडे दुर्लक्ष करीत आहे असे सर्व सामान्य जनतेचे म्हणणे आहे. रुग्णांना योग्य ते उपचार दिले जातात की नाही यावर देखील शंका नागरिकांना निर्माण होताना दिसून येत आहे
अधिस्थिती गंभीर: मुक्ताईनगर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये गरोदर महिलांना पिण्याच्या पाण्याची अत्यंत कमी उपलब्धता आहे. यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
लाईट चा अभाव: रात्री बेरात्री विद्यूत व्यवस्था बंद असल्यामुळे गरोदर महिलांना त्रास सहन करावा लागतो, ज्यामुळे नवजात बालकांना देखील समस्या उद्भवत आहे
सुलभा स्वच्छालयाची स्थिती: स्वच्छालयासाठी देखील पाण्याची उपलब्धता नाही, यामुळे महिलांचे आरोग्य आणखी बिघडत आहे.
प्रशासनाचे लक्ष नसल्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये प्रश्न उपस्थित झाला आहे.
उपचाराची शंका:
या गंभीर परिस्थितीवर तरतूद केली जावी, अन्यथा रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.



