पत्रकारबुलढाणामहाराष्ट्रसंपादकीयसामाजिकसांस्कृतिक

आंबेडकर यांचे जीवन प्रेरणादायी. सुनील गडाख,विविध उपक्रमांनी डॉ .आंबेडकर यांना अभिवादन* सोनई/शनिशिंगणापूर-

( विजय खंडागळे)–नेवासा तालुक्यातील सोनई येथे ज्ञान, समता आणि न्यायाचे प्रतीक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. आंबेडकर प्रेमींनी एकत्र येऊन डॉ .बाबासाहेब आंबेडकर चौक यथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर‌ यांच्या स्तभला पुष्पहार अर्पण करत, सर्वत्र पुष्पवृष्टी करण्यात आली. जिल्हा परिषदेचे बांधकाम व पशुसंवर्धन विभागाचे माजी सभापती सुनील गडाख म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन समाजाला प्रेरणादायी राहिलेले आहे त्यांच्या आदर्शातून शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा बाबासाहेबांचा प्रसिद्ध मंत्र आहे ज्याने मनुष्य जीवनाची दिशा बदलू शकते तेव्हा त्यांचे जीवन हे प्रेरणादायी असल्याचे मत गडाख यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे बांधकाम व पशुंवर्धन विभागाचे माजी सभापती सुनील गडाख, माजी पंचायत समिती सदस्य राजू गुगळे, सोन्याचे सरपंच धनंजय वाघ, प्रा. सिताराम रौंदळ,प्राचार्य झिने,युवा नेते प्रकाश शेटे,माजी सरपंच दादासाहेब वैरागर युवा कार्यकर्ते सचिन पवार समाजभूषण विजय जगताप संजय वैरागर उदय पालवे बापूसाहेब मोहोळ, आणि मान्यवर उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमींनी महिला पुरुष यांनी दिवसभर पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.स्तंभ स्थळाला फुलाची सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली होती .चौकट–* रात्री मनोरंजन म्हणून ठाणे, पुणे,अहील्यानागर,येथील “जागर महापुरुषांचा”सदाबहार गीतांचा भीम गीताचा नागरिकांना एक शानदार मेजवानी यावेळी आयोजित करण्यात आली होती.या कार्यक्रमाला मोठा उस्फुर्त प्रतिसाद देत एकच जल्लोष केला.या कार्यक्रमास नेते अशोकराव गायकवाड, संजय सुखदान यांच्यासह मान्यवरांनी हजेरी लावली त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या प्रसंगी नेते हभप.विश्वसराव गडाख,नेते अशोक गायकवाड,संजय सुखदान यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पवार यांनी केले. आभार माजी सरपंच दादासाहेब वैरागर यांनी मानले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button