Uncategorized

मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत ने स्वच्छतेला दिली तिलांजलीमलकापूर प्रतिनिधी (शेख निसार):-

स्वच्छ गाव- सुंदर गाव एक कदमस्वच्छता की और असा नारा देत स्वच्छतेवर करोड़ो रूपयांचा निधी सर्वत्र खर्च होत असतांना मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायतमध्ये मात्र परिस्थिती विपरीत अशीच असून या ग्रामपंचायतमध्ये स्वच्छतेचे तीनतेरा वाजल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.स्वच्छतेकरीता दरवर्षी प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर शासन,प्रशासनाकडून लाखो, करोड़ो रूपयांचा निधी देण्यात येतो, तर शासन स्तरावर ग्रामपंचायतींकरीता विविध स्पर्धाही घेतल्या जातात. मात्र काही ग्रामपंचायतीकडून केवळ स्वच्छतेचे कागदी घोडे नाचवित स्वच्छतेमध्ये आम्ही कसे पुढे असे भासविले जात आहे. मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायतमध्ये अशाच प्रकारे विविध भागांमध्ये घाणीचे साम्राज्य स्वच्छतेचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे. ग्रामपंचायतकडून स्वच्छतेवर खर्च केला जातो मात्र ही स्वच्छता नक्की केली कोठे जाते?असा प्रश्न आता जनतेला पडला आहे.कारण ग्राम पंचायतीमधील विविध भागांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे अनेक रस्त्यावर व रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग बघावेस मिळतात त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर झालेल्या घाण व काचऱ्यामुळे सर्वत्र मच्छरांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांचे आरोग्य ही धोक्यात आले आहे.मलकालपूर ग्रामीण ग्रामपंचायतमध्ये अनेक अपार्टमेंट,गल्ली-बोळात ठिकठिकारणी कच्याऱ्याचे ढिग साचलेले आहे. तर शिळे अन्न, प्लास्टीक कचरा व आरोग्यास घातक असलेला कचरा हा अनेक ठिकाणी पडलेला दिसुन येतो. या घाणीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्राम पंचायत प्रशासनाने तातडीने या भागातील घाण व कचरा साफ करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

चौकट 👇👇👇

आठ दिवसात घाण व कचरा साफ करा अन्यथा ग्रा.पं. कार्यालयात
कचरा आणून टाकूः निलेश बाळु चोपडे यांचा इशारा
मलकापूर ग्रामीण भागातील कचरा येत्या आठ दिवसाच्या आत साफ
करावा अन्यथा ग्रामपंचायत मध्ये कचरा आणून टाकला जाईल आणि तीत्र आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश
बाळू चोपडे यांनी एका निवेदना मार्फत दिला आहे.
तसेच ग्रामपंचायतच्या वतीने घरोघरी जाऊन कचरा संकलित करण्यात येतो. परंतु काही नागरिक घंटागाडीत
कचरा टाकण्याऐवजी रस्त्यावर कींवा रस्त्याच्या कडेला आणून टाकतात. रस्त्यावर कचरा टाकण्याविरुध्द कारवाई करण्यात यावी,अशीही मागणी दिव्यांग फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष निलेश बाळुचौपडे यांनी ग्रामसेवक तथा प्रशासक मलकापूर ग्रामीण ग्राम पंचायत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button