खानदेशजळगावा जिल्हा

गॅस सिलिंडरचा स्फोट एकाचा दुर्देवी मृत्यू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

जळगाव प्रतिनिधी प्रमोद सोडले

२६ मार्च २०२४अमळनेर तालुक्यातील पिंपळी रविवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीत घरातील कर्त्या पुरुषाचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेत दिलीप नामदेव पाटील यांचा मृत्यू झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पाटील यांच्या पत्नी रविवारी सायंकाळी दिवा लावत असतानाच घरात अचानक आग लागली आणि त्यातच गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. घराचे लाकडी छत आणि घरात कापूस असल्याने सर्व घरातच आग पसरली. दिलीप यांच्या पत्नी, मुलगा आणि नात तातडीने घराबाहेर पळाले मात्र दिलीप यांना चक्कर आल्याने ते घरात अडकून पडले. ग्रामस्थ मिळेल त्या साधनांनी आग आटोक्यात आणून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत होते. बर्‍याच प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली मात्र तोपर्यंत त्यांचा होरपळून मृत्यू झाला. आगीत पाटील यांच्या पत्नी संगीता, मुलगा विकी व नात खुशी हे देखील जखमी झाले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button