खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

ए आय च्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर छायाचित्रकार यांनी करावा – पो नी संदीप पाटील

छायाचित्रकार दिनाचा कार्यक्रम उत्साहात

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
रावेर दि प्रतिनिधी विकास आमोदकर

येथे छाया चित्रकार दिनाच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमात अधिकारी पत्रकार आणी छायाचित्रकार यांचा संवाद कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी अध्यक्ष स्थानी पोनी संदीप पाटील हे होते तरी प्रमुख वक्ते जेष्ठ पत्रकार दीपक नगरे, दिलीप वैद्य हे होते प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष शीतल पाटील रावेर शिक्षण संवर्धक संघ संचालक तुषार मानकर डी डी वाणी सुनील महाजन गणेश महाजन गणेश खरे संतोष नवले कांतीलाल गाढे रवी महाजन हे उपस्थित होते
प्रास्ताविक व सूत्रसंचालन मोनू महाजन व विक्रांत मराठे यांनी केले.
कॅमेरे पूजन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली
दीपक नगरे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, फोटोग्राफी चे तंत्रज्ञान वेगाने बदलत गेले आहे. या वाटचालीत फोटो ग्राफरने होणारे बदल आत्मसात करावे आणी होणाऱ्या धावपळीत आपल्या सह आपल्या कुटुंबाचे आरोग्य जपले पाहिजे तरी दिलीप वैद्य यांनी फोटोग्राफीचा इतिहासाला उजाळा देत अनेक रंजक आठवणी सांगून सर्वांनी काळानुरूप तंत्रज्ञान अवगत करावे. असेही आवाहन केले. पोनी संदीप पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, रोल कॅमेरा ते आजचे ए आय तंत्रज्ञान या वाटचाली विषयी मार्गदर्शन करतांना म्हटले की, फोटोग्राफी करत असतांना आपले कौशल्य आणी तंत्रज्ञान यांची सांगड बसवून व्यवसाय करावा कोणत्याही अमिषाला व व्यसनाधीनतेला बळी पडू नका
आभार तसलीम तडवी यांनी मानले तरी परिश्रम रावेर तालुका छायाचित्रकार मित्र परिवार व सर्व पदाधिकारी यांनी घेतले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button