विदर्भ
२४ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
- शेगाव । शहरातील तिनपुतळे – परिसरातील २४ वर्षीय – महिला २७ जुलै रोजी – घरून निघुन गेल्याचा – रिपोर्ट शहर पो.स्टे.ला – देण्यात आला आहे.
फिर्यादी संघपाल अंबादास इंगळे (३३) रा. तिनपुतळे परिसर शेगाव यांनी शहर पो.स्टे.ला दिलेल्या – रिपोर्टनुसार फिर्यादीची पत्नी – सौ. निकीता संघपाल इंगळे (२४) – रंग सावळा, उंची ५ फुट २ इंच, – बांधा सडपातळ, केस लांब काळे, अंगात गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस,
पायात काळ्या रंगाची चप्पल ही २७ जुलै रोजी सकाळी ९ ते सायं. ६ वा. दरम्यान कोणालाही न सांगता कुठेतरी निघुन गेली. फिर्यादीने शेजारी, गावात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला असता मिळुन आली नाही. तिचा शोध व्हावा करिता फिर्यादीने पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी मिसिंगची नोंद घेऊन प्रकरण तपासात घेतले आहे. घटनेचा तपास नापोकॉ प्रदीप मेसरे हे करित आहेत.



