मालेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्याचे उपोषण सोडवले,मागण्या मान्य…

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगांव : – मालेगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते गजानन विजय काळे यांचे नगरपंचायत अधिकारी व ठेकेदारांच्या मनमानी कारभाराविरुद्ध चालू असलेले आमरण उपोषण आज पाचव्या दिवशी सोडवण्यात आले आहे यावेळी नगरपंचायतचे मुख्य अधिकारी सतीश शेवदा आणि एडवोकेट नकुल देशमुख यांच्या पुढाकार्याने हे उपोषण समाप्त करण्यात आले गजानन विजय काळे यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आले होते नगरपंचायतचे मुख्य अधिकारी सतीश शेवदा यांनी सामाजिक कार्यकर्त्याला त्यांच्या सर्व मागण्या १५ दिवसांच्या आत लेखी पत्राद्वारे मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे एडवोकेट नकुल देशमुख यांनी नगरपंचायत कडून योग्य कार्यवाही होण्याची हमी घेतली आहे. गजानन विजय काळे यांनी या मागण्या पूर्ण न झाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे या आंदोलनाला मालेगाव वाशी तसेच व्यापारी वर्गाने मोठे सहकार्य केले त्यांनी प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलनकर्त्याला पाठिंबा दिला या घटनाक्रमामुळे मालेगाव शहरात मोठी चर्चा निर्माण झाली आहे सर्वसामान्य जनतेला उपोषणाच्या मार्गावर जाण्याची वेळ आली असताना,
नेतेमंडळींची अनुपस्थिती हा चिंताजनक विषय आहे नगरपंचायतने तातडीने कार्यवाही करून जनतेच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
आंदोलनकर्त्याचे प्रतिक्रिया:
“आपण सर्वांनी मिळून भ्रष्टाचाराच्या विरोधात सुरू केलेल्या आंदोलनातील उपोषणाची सांगता आज दिनांक 05/06/2024 शुक्रवारी झाली. मालेगाव नगर पंचायतचे मुख्य अधिकारी सतिष शेवदा साहेब ह्यांनी आपल्या सगळ्या मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन आपल्याला दिले पुढच्या पंधरा दिवसात अपेक्षित कार्यवाही न झाल्यास आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे नगर पंचायत तर्फे योग्य कार्यवाही करून घेण्याची हमी ऍड. नकुल देशमुख यांनी घेतली आहे. आपले आंदोलन इथे संपलेले नसून हा फक्त अल्पविराम आहे. योग्य कार्यवाही न केल्यास पूनश्च हरी ओम म्हणत आपले आंदोलन अधिक तीव्र करूयात.”
सामाजिक कार्यकर्ता गजानन विजय काळे,मालेगाव



