मुक्ताईनगरला काँग्रेस, राष्ट्रवादीकडून अब्दुल सत्तार यांचा पुतळा जाळून निषेध

*मुक्ताईनगर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्ताईनगर आणि काँग्रेसच्या वतीने अब्दुल सत्तार यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. तहसीलदारांना निवेदन देऊन सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर हिंदू बांधवांच्या भावना दुखावणारा हर हर महादेव चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, खा. सुप्रीया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला नेत्या असून त्यांच्या बाबत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अत्यंत आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांचा निषेध करतो. राज्याच्या मंत्री पदावर असणाऱ्या एखादया व्यक्तीने महिला लोकप्रतिनिधी बद्दल असे विधान करणे म्हणजे समस्त महिला वर्गाचा अपमान करण्यासारखे आहे. अशा हीन वृत्तीच्या व्यक्तीने मंत्री पदावर राहणे योग्य नाही तरी त्यांचा त्वरित राजिनामा घेण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी यावेळी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, काँग्रेस ओबीसी सेल उपाध्यक्ष डॉ जगदीश पाटील होते.राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस संजय पाटील, तालुकाध्यक्ष यु डी पाटील, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, शहराध्यक्ष राजेंद्रमाळी, युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, जि प सदस्य निलेश पाटील, माजी सभापती विलास धायडे, प्रदिप साळुंखे, रामभाऊ पाटील, बिडी गवई, डॉ सी महाजन, सरचिटणीस रविंद्र दांडगे, सुनिल काटे, रणजित गोयनका, नंदकिशोर हिरोळे, हरिष ससाणे, एजाज खान, पवन डी पाटील, सुभाष पाटील, प्रविण कांडेलकर, प्रशांत भालशंकर, रउफ खान, शरीफ मेकॅनिकल, कैलास कोळी, जे के चौधरी, गोपाळ पाटील, भाऊराव पाटील, विनोद काटे, अजय तळेले, मयुर साठे, जुबेर अली, इरफान खान, वहाब खान, हाशम शाह, मुस्ताक मण्यार, नजिम खान, अयाज पटेल, फारूक सैय्यद, समीर शेख, फिरोजभाई आदी पदाधिकारी उपस्थित






