जि प प्राथ शाळा सहस्त्रलिंग ता रावेर शाळेत राबविण्यात आला ” एक पत्र पर्यावरणासाठी ” उपक्रम

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
रावेर ता प्रतिनिधी विनोद तायडे
या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना दुर्मिळ होत चाललेल्या पत्रलेखन या प्रकाराची ओळख करून देत रावेर तालुक्यातील विविध ग्रामपंचायती यांना पत्र पाठविण्यात आले व गावातील विविध पदाधिकारी, गणेशोत्सव मंडळे, दुर्गोत्सव मंडळे, महापुरुषांच्या जयंती उत्सव समित्या, सामाजिक-धार्मिक संघटना, शाळा, बचत गट, पर्यावरण प्रेमी नागरिकांना गाव परिसरात वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले…….
या सोबतच रावेर तालुक्यातील विविध अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनाही सदर आशयाचे पत्र पाठवण्यात आले……. सदर उपक्रम यशस्वीतेसाठी श्री विकास सुरवाडे सर, श्री साईनाथ चन्ने सर, सरपंच अकीला युनूस तडवी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष युनूस तडवी, सदस्य आसिफ तडवी यांनी सहकार्य केले….



