जळगावा जिल्हाराजकीय

सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, दिव्यांग सशक्तीकरण विभाग, भारत सरकार अंतर्गत इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जिल्हा शाखा जळगाव संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जळगावडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदीरासमोर, महाबळ रोड, जळगाव

सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, दिव्यांग सशक्तीकरण विभाग, भारत सरकार अंतर्गत इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जिल्हा शाखा जळगाव संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जळगावडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदीरासमोर, महाबळ रोड, जळगाव प्रति,आ. क्र. 946/22 दि. 7/11/2022मा. जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा रुग्णालय, जळगाव.विषय: आमदार निधीतून मुक्ताईनगर तालुक्यातील दिव्यांग लाभार्थीच्या साहित्यवाटपाच्या तपासणी शिबीराच्या आयोजनाबाबत.महोदय,वरील विषयानुसार, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2022-23 अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील दिव्यांगांच्या सहाय्यक साहित्य व उपकरणे वाटप करण्यासाठी मा. श्री. चंद्रकांत पाटील, विधानसभा सदस्य मुक्ताईनगर यांच्या वतीने रु. 10 लक्ष निधी मंजुर करण्यात आला आहे.त्या अनुषंगाने मा. आमदार महोदय यांच्या मतदार संघातील दिव्यांगांना आवश्यक साहित्य व उपकरणे उपलब्ध करुन देण्यापुर्वी पात्र लाभाथ्र्यांची निवड करण्यासाठी मा. आमदार महोदय यांच्या निर्देशानूसार दि. 12 नोव्हेंबर 2022 रोजी तपासणी व मुल्यमापन शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. सदर तपासणी शिबीरात आपल्या अधिनस्त तज्ञ व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे तज्ञामार्फत मुल्यमापन करण्यात येणार आहे. तपासणी शिबीरानंतर पात्र लाभार्थ्याची यादी, खर्चाचे अंदाजपत्रक व लाभार्थ्याचे कागदपत्रे इ. पुढील कार्यावाहीसाठी आपणास सादर करण्यात येईल.तरी मा. आमदार महोदय यांच्या निर्देशानूसार दि. 12 नोव्हेंबर 2022 शनिवार रोजी ग्रामीण रुग्णालय, मुक्ताईनगर येथे आयोजीत तपासणी शिबीरासाठी आपल्या अधिनस्त असलेले मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी यांना तसेच जिल्हा रुग्णालय जळगाव येथील संबधीत कर्मचारी यांना शिवीरास सकाळी 10 वाजता उपस्थित राहुन तपासणी शिबीरास सहकार्य करणेबाबत आपल्या स्तरावर आदेशीत होण्यास विनंती आहे.आपला विश्वास.केंद्र प्रमुख जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जळगाव.माहितीस्तव सविनय सादर मा. श्री. चंद्रकांत पाटील, विधानसभा सदस्य, मुक्ताईनगर,

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button