खानदेशजळगावा जिल्हामुक्ताईनगर

३० टक्के कमिशनचा आरोप; हरताळा गावातील कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

शीर्षक : ३० टक्के कमिशनचा आरोप; हरताळा गावातील कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह


मुक्ताईनगर प्रतिनिधी | हरताळा (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव)
हरताळा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत शोषखड्ड्यांची कामे जिल्हा परिषदेमार्फत टेंडर प्रक्रियेतून मंजूर झाली आहेत. तसेच गावातील हनुमान मंदिराजवळील सभा मंडप, जल जीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा कामे आणि शादी खाना उभारणी ही कामेदेखील टेंडरद्वारेच पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती आहे.
मात्र संबंधित ठेकेदारांना विचारणा केली असता, “वरच्या स्तरावर ३० टक्के कमिशन द्यावे लागते,” असा धक्कादायक आरोप ग्रामस्थांसमोर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या कथित कमिशनमुळेच गावातील विविध विकासकामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.
गावकऱ्यांच्या मते, शोषखड्डे, पाणीपुरवठा यंत्रणा तसेच सभा मंडपाच्या बांधकामात दर्जाहीन साहित्याचा वापर झाल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी कामे अपूर्ण अवस्थेत असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे पंधरावा वित्त आयोगाच्या निधीतून संबंधित ठेकेदारांना देय रक्कम अदा करू नये, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
याशिवाय “ठेकेदार ३० टक्के कमिशन नेमके कोणाला देतात?” असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच कामांची तांत्रिक तपासणी करून गुणवत्तेचा अहवाल जाहीर करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान, संबंधित यंत्रणांनी या आरोपांची दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गावातील विकासकामांमध्ये पारदर्शकता व गुणवत्ता राखली जावी, हीच नागरिकांची प्रमुख मागणी आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button