गुन्हेगारीमहाराष्ट्रमुबई

मुलीची छेड काढल्याचा आरोप करत तरुणाला लुबाडले. स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

मुलीची छेड काढल्याचा आरोप करत तरुणाला लुबाडले. स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

ठाणे जिल्हा प्रतिनिधी

प्रफुल्ल पहूरकर

मुलीची छेड काढल्याचा बनाव करीत सर्वेशकुमार पटेल (२७, रा. इंदिरानगर, ठाणे) या तरुणाचे चाकूच्या धाकावर अपहरण करीत लुटणाऱ्या अशरफ शेख (२२), जमीर उर्फ जवा नुरुल शेख (३४) आणि झाकीर शेख (२४) या तिघांना अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी शुक्रवारी दिली. त्यांच्याकडून रिक्षा आणि मोबाईल हस्तगत केला.यातील तक्रारदार पटेल हे २० नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट भागातील गोपालाश्रम हॉटेलजवळून पायी जात होते. त्याचवेळी या तिघांनी आपसात संगनमत करुन ते एका रिक्षातून त्यांच्याकडे आले. ‘तू यहाँ लडकी को छेड रहा है’, असा आरोप करीत त्यांना जबरदस्तीने रिक्षात कोंबून चाकूचा धाक दाखवला. आरडाओरडा केला तर ठार मारण्याची धमकी देत त्यांना ठाण्याच्या रघुनाथनगर भागातील एलबीएस रोड, नितीन नाका आणि लुईसवाडी परिसरात फिरवले. त्यांच्याकडून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँक खात्यातून आधी आठ हजार रुपये आणि नंतर ४० हजार रुपये असे ४८ हजार रुपये ऑनलाइन यूपीआयद्वारे काढून

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button