जय बजरंग विद्यालयात मुलींनी बांधल्या वृक्षाला राख्या

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव:- ता:-२३ तालुक्यातील सुकांडा येथील जय बजरंग विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनीनी वृक्षाला राख्या बांधून रक्षाबंधन सन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला.
मुलींनी वृक्ष हेच आमच्या सह सर्वांचे भाऊ व सगेसोयरे असून ते प्रदूषणापासून सर्वांचेच रक्षण करतात.भाऊ बहिणीच्या नात्या प्रमाणे सदैव वृक्षांचे संगोपन व्हावे, त्यांचेही संरक्षण व्हावे अशी मुला, मुलींनी प्रार्थना केली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुमेध तायडे, तसेच शाळेच्या परिसरात शंभर वृक्ष लावून त्याची सतत जोपासना करुन, ते वाढविल्या बद्दल शाळेचे वृक्ष प्रेमी चतुर्थ कर्मचारी गितेश नागापुरे यांचे मुख्याध्यापक तायडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी माधव डोळे, प्रमोद राठोड,पंढरी जायभाये, अमोल वानखेडे,रुपेश तारे, संदीप सांगळे, राजेश्वर काटकर, आरती गितेश नागापुरे,कल्याणी आंधळे यांच्या सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



