महाराष्ट्रमुबई

त्या दिवशी तुला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही”, मोदी सरकारचा उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांचं भाष्य

त्यादिवशी तुला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही”, मोदी सरकारचा उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांचं भाष्य, म्हणाले… स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहूरकर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देशातील छापेमारीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या नऊ वर्षात देशातील विविध राजकीय नेत्यांच्या घरी छापेमारी करण्यात आली. मात्र संबंधित नेत्यांवर गुन्हा दाखल केला नाही. शिवाय संबंधित भ्रष्टाचाराचं प्रकरण न्यायालयात न नेता मध्येच लटकावून ठेवल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. ते संविधान सन्मान महासभेत बोलत होते.“तुम्ही आमच्या विरोधात जाणार असाल तर आम्ही छापेमारी करू आणि तुम्हाला तुरुंगात पाठवू, अशा धमक्या देऊन येथील व्यवस्थेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. खऱ्या अर्थाने आपण विचार केला तर आपण या देशाचे मालक आहोत आणि ज्याला निवडून दिलंय, तो आपला नोकर आहे. एवढं लक्षात ठेवा. पण दुर्दैवाने मालकाने आपलं मालकपण सोडलं आहे,” असं प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केलं.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button