तेल्हारा तालुक्यातील दापुरा फाटा येथे आढळले 16 क्विंटल गोवंशांची शिंगे! , तेल्हारा पोलिसांची धडक कारवाई!, २,६६,०००/-रू चा मुददेमाल जप्त!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे
तेल्हारा प्रतिनिधी
दि.13/01/2025| दि. ०७/ जानेवारी २०२४ च्या रात्री गुप्त माहिती बातमीदाराच्या माध्यमातून मिळाली की तेल्हारा तालुक्यातील ग्राम. दापुरा फाटा येथे एक अशोक लेलैंड कंपनीचे वाहन ( एम.एच.-२१-४४५१) क्रमांकाच्या गाडीचे समोर चे चाकाचे उजव्या बाजुचे एक्सेल तुटलेले दिसत असुन सदर वाहनामध्ये गोवंश जातीचे जनावरांची शिंगे दिसत आहेत, अशी माहीती मिळालेवरून पोस्टे तेल्हारा चे पोलिस निरिक्षक प्रमोद उलेमाले साहेब यांचे निर्देशावरून रात्रगस्त अधिकारी पो.हवा. प्रशांत बानेरकर, सोबत प्रो. पो.उप. नि. सागर कापसे, पोका बळीराम तारे, पो.कॉ देवानंद इंगळे , पो.हे.क. राजेश नागे, पो.कों. राम गव्हाळे यांचे सह सरकारी जिप ने रवाना झाले. घटनास्थळावर अशोक लेलैंड कंपनीचे वाहन क एम.एच.-२१-४४५१ यामध्ये अंदाजे १६ क्विं. गोवंश जातीचे शिंगे हे गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून त्यांची शिंगांची विल्हेवाट लावण्याकरता घेवुन जात असतांना मिळुन आले आहे. त्वरीत सदरची माहिती पो.नि. यांना देवुन घटनास्थळ कारवाही करून आरोपी १) सुनिल दादाराव मुळे वय १९ वर्षे रा. अहंकार देउळगाव ता. जि. जालना २) मोहम्मद शफी कुरेशी अताउल्ला खान वय ४५ वर्षे रा मोहल्ला नाला नजदीक कुरेशियान मसजीद संभल उत्तरप्रदेश यांना ताब्यात घेवुन आरोपीतांजवळुन गोवंश जातीचे शिंगे अंदाजे १६ क्विंटल किंमत अंदाजे १६०००/-रू व अशोक लेलैंड कंपनीचे वाहन क एम.एच.-२१-४४५१ अंदाजे किंमत २,५०,०००/-रू असा एकुण मुददेमाल किंमत २,६६,०००/-रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला, असुन आरोपीतांविरूध्द पो.कों. देवेंद्र इंगळे यांचे लेखी फिर्याद वरून पो.स्टे. तेल्हारा येथे नमुद आरोपीतांविरूध्द अप. नं. ०५/२५ कलम ५ (ब) ९ (क) प्राणी संरक्षण अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे. पुढिल तपास मा. पोलिस अधिक्षक श्री. बच्चन सिंह, सहायक पोलिस अधिक्षक सा श्री.अनमोल मित्तल, उपविभगीय पोलिस अधिकारी साहेब अकोट, पो.नि. प्रमोद उलेमाले यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि निलेश ठाकरे, पो.हवा. अमोल सोळंके पो.कों. संदिप तांदुळकर हे करीत आहेत.



