जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

मुक्ताईनगर विधानसभेसाठी 17 उमेदवार रिंगणात पक्षाच चिन्ह कोणते? नेमकं अनुक्रमांक कोणते?

मुक्ताईनगर प्रतिनिधी :-

मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवार रिंगणात राहणार आहेत तर आज माघारीच्या दिवशी 7 उमेदवारांनी स्वतःच्या इच्छेने माघार घेतलेली आहे. आज मुक्ताईनगर तहसील कार्यालय येथे सकाळपासूनच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांची लगबग होती. दुपारी तीन वाजेपर्यंत 7 उमेदवारांनी माघार घेतलेली आहे. तसेच सायंकाळपर्यंत 17 उमेदवारांना चिन्ह वाटपाचे कामकाज सुरू होते.

माघार घेतलेले उमेदवार खालील प्रमाणे:-

जितेंद्र पांडुरंग पाटील (रा. भालोद, ता. यावल), सुरेश शिवराम ठाकरे (रा. थोरगव्हाण, ता. रावेर) कांडेलकर संजय प्रल्हाद (रा. मुक्ताईनगर), कांडेलकर प्रतिभा संजय (रा. मुक्ताईनगर), रवींद्र एकनाथ बावस्कर (रा.कोल्हाडी, ता. बोदवड), सागर प्रभाकर पाटील (रा. बोदवड), सुरयाबानो दगडू शाहा (रा. सावदा, ता. रावेर) असे एकूण मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतलेले 7 उमेदवार आहेत.

1) अनिल गंभीर मोरे – बसपा – हत्ती

2) अनिल बाबुराव गंगतीरे – मनसे – रेल्वे इंजिन

3) ऍड.खडसे रोहिणी एकनाथराव – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) – तुतारी वाजविणारा माणूस.

4) चंद्रकांत निंबा पाटील – शिवसेना – धनुष्यबाण

5) अशोक बाबुराव जाधव – पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) – फळाची टोपली

6) संजय पंडित ब्राह्मणे – वंचित बहुजन आघाडी – गॅस सिलेंडर

7) अर्जुन तुळशीराम पाटील – अपक्ष – गळ्याची टाय

8) ईश्वर भागवत सपकाळ – अपक्ष – एयर कंडीशनर

9) उमाकांत आत्माराम मराठे – अपक्ष – ट्रंपेट

10) कवळे रोहिणी – अपक्ष – दूरदर्शन

11) खडसे रोहिणी – अपक्ष – सफरचंद

12) खडसे रोहिणी ताई – अपक्ष – बेबी वाकर

13) चंद्रकांतभाऊ पाटील – अपक्ष – ऑटोरिक्षा

14) चंद्रकांत पाटील – अपक्ष – रोड रोलर

15) जफर अली मकसूद अली – अपक्ष – जहाज

16) विनोद नामदेव सोनवणे – अपक्ष – बॅट

17) सुरेश रूपा तायडे – अपक्ष – कपाट

18) नोटा

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button