काँग्रेसच्या प्रचाराच्या पहिल्याच दिवशी गळती.

प्रभाग 1 मध्ये आज काँग्रेसचा प्रचार सुरु असतांनाच पंकज गिरींचा भाजपात प्रवेश
स्टार भारत लाइव बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतीनीधी ऋषिकेश देठे
सागरदादा फुंडकर यांच्या मार्गदर्शनात व भाजपा उमेदवार ॲड आकाशदादा यांच्या नेतृत्वावर विश्वास
खामगांव- आज दि.04/11/2024 रोजी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिलीप सानंदा यांच्या प्रचाराची सुरुवात प्रभाग क्र. 1 मधून सुरु असतांनाच काँग्रेस पक्षांच्या नगरसेवक पदाचे उमेदवार पंकज गिरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी सागरदादा फुंडकर यांनी त्यांना भाजपाचे दुपटटे घालून स्वागत केले.
विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाचे उमेदवाराची प्रचार रॅली या प्रभागात सुरु असतांना काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून यावेळी पंकज गिरी काँग्रेस पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते असून त्यांनी याआधी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर नगर सेवक पदाची निवडणुक लढवली होती. यांचेसह काँग्रेस पक्षाचे रतन गोरे, ऋषीकेश देशमुख, गौरव घुले, अभिषेक शिलारकर, सुजित चव्हाण, दिगंबर घुले, सागर उमाळे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांनी मतदार संघात केलेल्या विकास कामांवर विश्वास ठेऊन प्रवेश केला. पंकज गिरी यांच्या प्रवेशामुळे प्रभाग 1 मध्ये काँग्रेस पक्षाला खिंडार पडल्याचे बोलले जात आहे.
यावेळी भाजपाचे निवडणुक प्रभारी श्री संजय शिनगारे, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, प्रदेश सरचिटणीस भाजयुवा मोर्चा श्री राम मिश्रा, राकेश राणा, माजी नगर सेवक विलासराव देशमुख, सौ संतोष पुरोहित, पवन गरड, जितेंद्र कुयरे, रवि गायगोळ पाटील, अमोल राठोड, संदिप राजपूत, नगेंद्र् रोहणकार, यांची उपस्थिती होतीप्रभाग 1 मध्ये आज काँग्रेसचा प्रचार सुरु असतांनाच पंकज गिरींचा भाजपात प्रवेश
स्टार भारत लाइव बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतीनीधी ऋषिकेश देठे
सागरदादा फुंडकर यांच्या मार्गदर्शनात व भाजपा उमेदवार ॲड आकाशदादा यांच्या नेतृत्वावर विश्वास
खामगांव- आज दि.04/11/2024 रोजी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिलीप सानंदा यांच्या प्रचाराची सुरुवात प्रभाग क्र. 1 मधून सुरु असतांनाच काँग्रेस पक्षांच्या नगरसेवक पदाचे उमेदवार पंकज गिरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी सागरदादा फुंडकर यांनी त्यांना भाजपाचे दुपटटे घालून स्वागत केले.
विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाचे उमेदवाराची प्रचार रॅली या प्रभागात सुरु असतांना काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून यावेळी पंकज गिरी काँग्रेस पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते असून त्यांनी याआधी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर नगर सेवक पदाची निवडणुक लढवली होती. यांचेसह काँग्रेस पक्षाचे रतन गोरे, ऋषीकेश देशमुख, गौरव घुले, अभिषेक शिलारकर, सुजित चव्हाण, दिगंबर घुले, सागर उमाळे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांनी मतदार संघात केलेल्या विकास कामांवर विश्वास ठेऊन प्रवेश केला. पंकज गिरी यांच्या प्रवेशामुळे प्रभाग 1 मध्ये काँग्रेस पक्षाला खिंडार पडल्याचे बोलले जात आहे.
यावेळी भाजपाचे निवडणुक प्रभारी श्री संजय शिनगारे, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, प्रदेश सरचिटणीस भाजयुवा मोर्चा श्री राम मिश्रा, राकेश राणा, माजी नगर सेवक विलासराव देशमुख, सौ संतोष पुरोहित, पवन गरड, जितेंद्र कुयरे, रवि गायगोळ पाटील, अमोल राठोड, संदिप राजपूत, नगेंद्र् रोहणकार, यांची उपस्थिती होती