रेशन दुकानदार यांचेसह गोरगरीब कार्ड धारक यांच्या समस्या लवकरच सोडविणार आ.ॲड.आकाश फुंडकर

स्टार भारत लाइव बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतीनीधी ऋषिकेश देठे
खामगांव – मागील 2 महिन्यापासुन इपोस मशीनवर सर्वर डाउनने धान्य वाटपात अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील ईपास मशीनद्वारे धान्य वितरण करताना येणाऱ्या अडचणीच्या संदर्भात संबंधीतांशी चर्चा करुन या समस्याबाबत तातडीने उपाय योजनो करण्याबाबत निर्देश दिले असून रेशन दुकानदार यांचेसह गोरगरीब रेशन कार्ड धारकांच्या समस्या लवकरच सुटणार आहेत असे प्रतिपादन आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी स्वस्त़ धान्य़ दुकानदार यांच्याशी चर्चा करतांना केले.
महाराष्ट्र राज्यात 52 हजार स्वस्त धान्य दुकानदार सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत ईपास मशीनद्वारे धान्य वितरण करत असून मागील दोन महिन्यापासून ईपास मशीनवर धान्य वितरण करताना येणाऱ्या अडचणी व धान्य वितरण करता येत नाही मोल मजुरी करणाऱ्या लाभार्थींनाच तासन तास दुकानावर बसून राहावे लागते याबाबत तालुका स्तरापासून जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर तक्रार देऊनही कोणतीही सकारात्मक उपाययोजना न झाल्याने राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार यानी दिनांक 5 औगस्ट 2024 रोजी आपापल्या तहसील कार्यालयात ईपास मशीन जमा केल्या परन्तु तरीही ठोस निर्णय घेयला गेला नाही. सदया शेतीच्या मश्यागतिचे दिवस असून शेतकरी मंजूर कार्डधारक त्रस्त झाले आहेत आम्हाला दुकानदारांशी वाद होत आहेत.
त्यामुळे याबाबत संबंधीतांशी चर्चा करुन इपोस मशीन सर्वर प्रॉब्लम मुळे धान्य वाटप करताना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत असून वाटप रखडले आहे यावर उपाय योजना व्ह्यावी, धान्य वाटपचे कमीशन वेळेवर मिळाले पाहिजे, धान्य मोजूंन 50 किलो 500 ग्राम मिळाले पाहिजे, इ-केवायशिचा मोबदला मिळाला पाहिजे यां व इतर समस्याबाबत लवकरच मार्ग काढण्यात येणार असल्याचेही आमदार ॲड आकाश फुंडकर म्हणाले.
यावेळी आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्य सहकार्याच्या व सकारात्मक चर्चे बददल आभार व्यक्त़ कले. निवेदन देते वेळी शिवाभाऊ लोखण्डकार जिल्हा उपाध्यक्ष रवि महाले तालुका अध्यक्ष खामगाव विजय घोगरे शहर अध्यक्ष योगेश बेरोज्या, लल्ला ठाकुर, संजय जाधव, प्रदीप भोपळे, आनंदा हिवराळे, देवीदास खंडारे, सैयद नस्सू, रवि दळी, रवि वाकुड़कर यांचेसह अनेक दुकानदार उपस्थित होते .



