शिवसेना खामगाव तालुक्याची प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न.

शिवसेना जनसंपर्क कार्यालय खामगाव येथे आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी संदर्भात शिवसेना खामगाव तालुक्याची प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न.
प्रतिनिधी राजेंद्र मुंढे
दिनांक १५/१२/२०२५ रोजी केंद्रीय मंत्री माननीय नामदार प्रतापराव जाधव साहेब यांच्या आदेशावरून शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष पाटील डीवरे यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे अत्यंत महत्त्वाचे बैठक संपन्न झाली त्यामध्ये आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
त्यामध्ये आपण आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती सर्कल मध्ये इच्छुक उमेदवारांची नावे लवकरात लवकर कळवावी तसेच नवनियुक्त जिल्हाप्रमुख यांनी संघटन बांधणी संदर्भात सखोल मार्गदर्शन केले, त्यामध्ये प्रामुख्याने पक्षाकडून आलेले सूचनांचे वाचन केले तसेच पक्षाकडून आलेले नवीन पक्ष बांधणी कशी करावी हेचे सुद्धा सखोल मार्गदर्शन केले. तसेच शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून सुपीचीत झाला आहे. शिवसेना पक्ष हा नेहमीच कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला आहे.
याचा अनुभव सध्याच संपत आलेल्या नगरपरिषद निवडणूक मध्ये आलेला आहे. सद्यस्थितीत काही नगरपरिषद निवडणूक बाकी आहे. त्यामध्ये खामगाव येथील प्रभाग क्रमांक 16 चे ←
निवडणूक सुद्धा अद्याप पर्यंत बाकी असल्यामुळे तिथे शिवसेना शहर प्रमुख चेतन ठोंबरे यांच्या मातोश्री सौ. पुष्पाबाई मोहन ठोंबरे ह्या निवडणुकीत रिंगणामध्ये आहेत.
यांच्या पाठीशी पक्ष भक्कम पने उभा आहे. व पदाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत आपण प्रचारांमध्ये सहभागी होऊन पुष्पा बाई मोहन ठोंबरे यांच्या धनुष्यबाण निशाणी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असा निर्धार करण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे, शिवसेना शहर प्रमुख चेतन ठोंबरे, अनुसूचित जाती जमाती शहर प्रमुख
मयुर खंडारे, शिवसेना उप तालुकाप्रमुख योगेश देशमुख, शिवसेना उपतालुकाप्रमुख संतोष दुतोडे, अनुसूचित जाती जमाती तालुकाप्रमुख प्रकाश हीवराळे,
महिला आघाडी तालुकाप्रमुख जयश्री देशमुख, युवासेना
शहरप्रमुख
राहुल पुं कळमकार, रवी भाऊ माळवंदे, शिवा भाऊ गायकवाड, शाम भाऊ गायकवाड, किसान सेना तालुकाप्रमुख सुभाष पाटील वाकुडकर,
महिला आघाडी उपतालुकाप्रमुख कल्पना ताई
गायगोळ, युवती शहरप्रमुख
श्वेता ताई म्हसाळ, महिला आघाडी उपतालुकाप्रमुख ज्योती ताई बुजाडे, महिला आघाडी शहर संघटिका निर्मला आजी हेलोडे, शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रवीण पाटील धामोडे, सोनु चव्हाण, अशोक विटे, शिवसेना विभाग प्रमुख
प्रभु घोंगे, शिवसेना विभाग प्रमुख प्रदिप सपकाळ, शिवसेना उपशहर प्रमुख करण छापरवाल, शिवसेना उपशहर प्रमुख.बंदी पवार, शिवसेना उप तालुकाप्रमुख संतोष धोंडिबा सातव, शिवसेना विभाग प्रमुख, प्रविण गजानन माने, धम्मपाल दगड्डू गवई, राजेश यशवंत गव्हांदे गजानन देविदास गोळवे, देवानंद समाधान गव्हांदे, शिवसेना विभाग प्रमुख गोपाल पुखसिंग चव्हान, शिवसेना विभाग प्रमुख, गोपाल शेळके, शिवसेना विभाग प्रमुख ओम शंकर देशमुख,
रोहित सोनोने, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.



