शोकवार्ता : मुक्ताईनगर पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार महेंद्र सुरवाडे यांच्या मातोश्रींचे निधन

मुक्ताईनगर | प्रतिनिधी
मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले ठाणे अंमलदार श्री. महेंद्र शांताराम सुरवाडे यांच्या मातोश्री, बुद्धवासी निर्मला शांताराम सुरवाडे (वय – वृद्धापकाळ) यांचे आज पहाटे सकाळी 3.30 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनाने सुरवाडे कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. स्वभावाने शांत, धार्मिक व कुटुंबवत्सल असलेल्या निर्मलाताईंनी आपल्या आयुष्यात सामाजिक व कौटुंबिक मूल्यांचे पालन केले.
त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी 3.00 वाजता,
राहते घर – प्रबुद्ध नगर, घोडसगाव येथून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात पुत्र, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
या दुःखद घटनेबद्दल मुक्ताईनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.



