शेलूदमध्ये साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंतीचा जल्लोष; भव्य शोभायात्रेने गाव दुमदुमले

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली: तालुका: प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे
*डीजेच्या ठेक्यावर जल्लोष, वस्ताद लहुजी साळवे यांच्या जिवंत वेशभूषेने वेधले सर्वांचे लक्ष; युवक-युवती, महिला आणि ग्रामस्थांचा उत्स्फुर्त सहभाग
शेलूद :तालुका :चिखली साहित्यरत्न,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शेलूद येथे ५ ऑगस्ट रोजी उत्साह, जल्लोष आणि सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडविणारा भव्य सोहळा पार पडला. डीजे आणि बँडच्या दणदणाटात काढण्यात आलेल्या शोभायात्रेने संपूर्ण गाव दुमदुमून गेले, तर क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे यांची हुबेहूब वेशभूषा साकारलेल्या होमगार्ड गजानन साळवे यांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
जयंती सोहळ्याला शेलूदचे सरपंच मंगेश इंगळे, चिखली पंचायत समितीचे माजी सभापती अंकुशराव तायडे, कामगार नेते गजानन पवार, मातंग सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भाई छोटू कांबळे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर इंगळे, सामाजिक कार्यकर्ते दिगंबर पाटोळे, तुकाराम उबाळे, संजय काकफळे, किरण बोरकर, विजय निकाळजे, केशव लोखंडे, संतोष गायकवाड, सोनू गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी गावातील महामानवांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर निघालेल्या शोभायात्रेत युवक-युवती, महिला आणि ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत डीजेच्या ठेक्यावर नृत्य करत आण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर केला. संपूर्ण गावात उत्सवाचे आणि सामाजिक ऐक्याचे वातावरण निर्माण झाले होते.
या जयंती सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शेषराव साळवे, नितीन साळवे, किशोर साळवे, रामकृष्ण साळवे, प्रदीप साळवे, रमेश साळवे, मंगल यंगड, दादाराव साळवे, आकाश साळवे, गजानन साळवे तसेच वीर लहुजी आखाडा शेलूदचे अध्यक्ष रवी यंगड, उपाध्यक्ष संजय नाडे, सोहम साळवे, निलेश नाडे, लखन साळवे, श्याम साळवे, मंगेश साळवे, विशाल भालेराव, सतीश साळवे, संतोष निकाळजे, नागेश साळवे, संजय साळवे, सागर साळवे, नामदेव ढगे, गजानन बोके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
शेलूद येथील आण्णाभाऊ साठे जयंती सोहळा सामाजिक सलोखा, सांस्कृतिक परंपरा आणि महापुरुषांच्या विचारांप्रती असलेली निष्ठा अधोरेखित करणारा ठरला.✍️



