CSIR-NET परीक्षेत मुस्कान तडवीचे उल्लेखनीय यश

*सहायक प्राध्यापक पदासाठी ऑल इंडिया रँक १०१; तडवी समाजातून पहिली विद्यार्थिनी असल्याचा गौर व
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी : विनोद तायडे
तालुक्यातील बोरखेडा खुर्द येथील रहिवासी तथा सावदा येथे LIC मध्ये कार्यरत असलेले श्री. राजू तडवी यांची कन्या कु. मुस्कान राजू तडवी हिने CSIR-NET (जीवन विज्ञान) जून २०२६ परीक्षेत सहायक प्राध्यापक पदासाठी ऑल इंडिया रँक १०१ प्राप्त करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
मुस्कान तडवी हिने आपल्या मेहनत, जिद्द, बुद्धिमत्ता आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर ही कामगिरी केली आहे. तिच्या या यशामुळे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच संपूर्ण तडवी समाजाचा गौरव वाढला आहे.
विशेष म्हणजे आदिवासी तडवी समाजातून CSIR-NET जीवन विज्ञान परीक्षेत सहायक प्राध्यापक पदासाठी ऑल इंडिया रँक १०१ मिळविणारी ती पहिली विद्यार्थिनी ठरली आहे. तिच्या या कामगिरीमुळे समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण, संशोधन आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.
कु. मुस्कान तडवी हिच्या यशाबद्दल समाजाच्या विविध स्तरातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिक्षण व संशोधन क्षेत्रात तिने अशीच उत्तुंग भरारी घेत राहावी आणि भविष्यात यशाची नवनवीन शिखरे गाठावीत, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत.
दरम्यान, पिता-पुत्री दोघांचेही सर्वत्र अभिनंदन होत असून ओबीसी जनकल्याण संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत बोरकर, विमा प्रतिनिधी सौ. संगीता प्रशांत बोरकर, सलीम तडवी, अमित तडवी, LIC चे अधिकारी नवज्योत सिंग सिसोदिया, संजय चौधरी, रशीद तडवी यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.











