मुक्ताईनगर बस स्थानकामध्ये महिलांच्या पर्स लांबवणाऱ्या महिला टोळीला पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून केली अटक

( तालुका प्रतिनिधी प्रमोद सौंदळे)
सविस्तर वृत्त असे की सुकळी येथील रहिवासी सरलाबाई जिजाबराव पाटील आणि त्यांचे पती जिजाबराव पाटील पती-पत्नी आज दिनांक 15 /5/ 2025 ला सकाळी ठीक दहा वाजता सुकळी येथून रिक्षाने मुक्ताईनगर येथे पोस्ट ऑफिस मध्ये त्यांचे पासबुक घेण्यासाठी आणि किराणा घेण्यासाठी आलेले होते कामे आटोपून घरी जाण्यासाठी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान मुक्ताईनगर बस स्थानकात आले त्यावेळी कुऱ्हा गाडीमध्ये चढत असताना प्रवाशांची गर्दी त्या ठिकाणी होती त्या गर्दीमध्येच पाच ते सहा अनोळखी महिला चढण्यासाठी धक्काबुक्की करत होत्या त्यापैकी एका बाईने सरलाबाई जवळील पर्स मधील सोन्याचे दागिने आणि पैसे असलेली छोटी पर्स काढून घेतली असे त्यांच्या लक्षात आले तोपर्यंत त्या पाच-सहा महिला बस स्थानकातून पसार झालेले होत्या त्यांना काही कळत नव्हते त्या फार घाबरलेल्या होत्या काय करावे ते त्यांना कळत नव्हते त्या रडत होत्या तेवढ्यात त्या ठिकाणी प्रमोद सौंदळे हे पोहचले झालेला प्रकार त्यांनी प्रमोद सौंदळे यांना सांगितला त्यांनी जागरूकता दाखवत भ्रमणध्वनीवरून पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना झाल्या प्रकाराची माहिती दिली तात्काळ पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल महेद्र सुरवाडे, पोलीस कॉन्स्टेबल गोविंद पवार, महिला पोलीस कॉन्स्टेबल सुवर्णा पाटील यांना सूचना करत बस स्थानकात पाठवले पोलिसांनी बस स्थानकात सरलाबाई तसेच इतरही महिला प्रवाशांना विचारणा करून सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी त्यांच्या सोबत असणारे पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र सुरवाडे यांना बोदवड चौफुली कडे जाऊन महिलांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या त्या ठिकाणी काही महिला आहेत असे सुरवाडे यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक यांना भ्रमणध्वनी वरून कळवले लागलीच पूर्ण टीम तिथं बोदवड चौफुली या ठिकाणी पोहोचली आणि महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांच्याजवळ सरलाबाई पाटील यांचे चोरीला गेलेली पर्स त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली त्या सर्व महिलांना अटक करण्यात आलेली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे पुन्हा एकदा मुक्ताईनगर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी आणि कर्तव्यदक्षता मुक्ताईनगर करांना अनुभवायला मिळाली पोलीस निरीक्षक नागेश मोहिते तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र सुरवाडे पोलीस कॉन्स्टेबल गोविंद पवार महिला पोलीस कॉन्स्टेबल सुवर्णा पाटील या सर्वांचे सरलाबाई पाटील आणि जिजाबराव पाटील यांनी आभार मानले मुक्ताईनगर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे..



