शेगावात श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी..पुत्रदा एकादशी निमित्त

शेगावात श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी..
पुत्रदा एकादशी निमित्त
(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
शेगाव:दि. २७ ऑगस्ट
महिन्यातील चौथ्या शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी
आणि पुत्रदा एकादशी निमित्ताने शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.
आँगष्ट महिन्यातील चौथ्या शनिवार, रविवार सुट्टी असल्याने लागोपाठ दोन दिवस शासकीय कार्यालय व बँकेला सुट्या आहेत. लागोपाठ आलेल्या दोन दिवसाच्या सुट्ट्या मुळे त्याचप्रमाणे मुला-मुलींना शाळा कॉलेज सुट्टी असल्यामुळे शेगाव येथील संत शिरोमणी श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनाकरिता बाहेरगावावरून शेकडो खाजगी वाहनाने, राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस तसेच रेल्वेने प्रवास करून हजारो भाविक संतनगरी शेगावात पोहोचले व त्यांनी पहाटे पाच वाजता पासून श्रींच्या मंदिरात दर्शनाकरिता एकच गर्दी केली होती श्री संत गजानन महाराजांच्या भुयार मधील मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी जवळपास दोन ते तीन तास रांगेत उभे राहून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व श्रद्धेने याचप्रमाणे श्रींच्या मंदिरातील नियमांचे शिस्तीचे काटेकोरपणे पालन करीत हजारो भाविकांनी श्री संत गजानन महाराजांच्या भुयारातील मूर्तीचे ,श्रीराम, लक्ष्मण व माता सीता यांच्या मूर्तीचे तसेच श्रींच्या शयनकक्षात गादी येथे श्री विठ्ठलाच्या व हनुमंताच्या मूर्तीचे दर्शन घेऊन फराळ महाप्रसादाचा लाभ घेतला.. याचप्रमाणे अनेक भाविकांनी श्री दासगणू महाराज रचीत श्री गजानन विजय ग्रंथ मधील २१ अध्यायाचे मोठ्या श्रद्धेने पारायण केले. दोन दिवस लागोपाठ सुट्ट्या असल्याने शेगाव मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेलेले दिसत होते. भाविकांच्या गर्दीमुळे मंदिराजवळ असलेले फुलांचे हार विक्री करणारे, पेढा विक्री करणारे याचप्रमाणे इतर लहानसहान वस्तू कुंकू गुलाल अष्टगंध विक्रेत्यांची चांगली विक्री झाली. श्रींच्या मंदिरात परिसरात भाविकांकडून गजानन महाराज की जय ,जय गजानन श्री गजानन चा ,जयघोष होत असल्याने संपूर्ण वातावरण गजाननमय झालेले दिसत होते.



