अज्ञात वाहनचालकाने धडक देऊन १९ वर्षीय युवकाचा मृत्यू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव : अकोट रोडवरील
हॉटेल विश्वजित जवळ २५ मे २०२४ रोजी अपघात होऊन १९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेची फिर्याद २७ जुलै रोजी पोलिसात दिल्यानंतर अज्ञात वाहनचालक आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केशव महादेव वासनकार वय ४३ वर्षरा. हाताता. बाळापूर जि. अकोला यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली की, माझा मुलगा मयत ओम वासनकार वय १९ वर्ष हा शेगाव येथून गावी हाता येथे त्याचे ताब्यातील सुझुकी अॅक्सेस १२५ कंपनिची स्कुटी क्र. एमएच३० बीपी ४१३९ ने शेगाव येथुन येत असताना, शेगाव अकोट रोड वर हॉटेल विश्वजित जवळ कोणीतरी अज्ञात वाहण चालकाने त्यांचे ताब्यातील वाहण भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून माझ्या मुलाचे ताब्यातील दुचाकीला धडक मारून अपघात करुन त्यास गंभिर जखमी करुन त्याचे मरणास कारणीभूत झाला आहे, अशा तोंडी रिपोर्टवरून व मेडीकल सर्टिफिकेटवरून कलम २७९, ३०४ (अ), ३३८ भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे



