खानदेशजळगावा जिल्हामुक्ताईनगरशैक्षणिक
सात विद्यार्थ्यांची क्रिकेट साठी राष्ट्रीय स्तरावर निवड

मुक्ताईनगर प्रतिनिधी

मुक्ताईनगर येथील डॉ. जगदीश पाटील इंग्लिश मिडीयम सी. बी.एस.ई. स्कूल च्या आरूष पटेल, समर्थ दुट्टे, क्रिश पाटील, तोषण गोहर, आर्यन सुरडकर, शिवराज देशमुख आणि स्वरूप पाटील अश्या सात विद्यार्थ्यांची क्रिकेट साठी राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. यासाठी शाळेचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. जगदीश पाटील, संचालिका डॉ. माधुश्री पाटील, सर्व व्यवस्थापन मंडळ, प्राचार्य डॉ. योगेश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि शाळेचे क्रीडा शिक्षक मूबीन शेख यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. आज दि. 26 एप्रिल 2024 रोजी सकाळी विद्यार्थी आणि क्रीडाशिक्षक दिल्ली ला राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी रवाना झाले.



