बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

देऊळगाव राजा पोलिसांची रात्रीची गस्त; देऊळगावमही शिवारात १३ जुगारी रंगेहात पकडले

देऊळगावमही शिवारात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा मोठा छापा; १३ जणांविरुद्ध गुन्हा, २७,३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी;शंकर शिवरकर

देऊळगाव राजा:देऊळगाव राजा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील देऊळगावमही शिवारामध्ये पैशांच्या हार-जीतवर सुरू असलेल्या ‘एक्का-बादशहा’ नावाच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी रविवारी (२३ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास मोठा छापा टाकला. या धडक कारवाईत पोलिसांनी १३ जुगारांना रंगेहात पकडून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, रोख रकमेसह एकूण २७,३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगावमही शिवारात काही लोक बेकायदेशीरपणे जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे फिर्यादी पोलीस अंमलदार माधव नारायण कुटे (ब.नं. १२०२) यांनी पंचांसह घटनास्थळी छापा टाकला. २२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री २३:४५ वाजेच्या सुमारास हा रेड करण्यात आला.

या छाप्यात पोलिसांनी आरोपींना ‘एक्का-बादशहा’ नावाच्या जुगारावर पैशांची हार-जीत करताना रंगेहात पकडले. पकडण्यात आलेल्या सर्व १३ आरोपींची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता खालीलप्रमाणे मुद्देमाल मिळून आला:

१. सतिष साहेबराव खिल्लारे (वय ३२, रा. देऊळगावमही) – नगदी २,०५० रुपये.
२. ज्ञानेश्वर गोपाळ वाघ (वय ३८, रा. देऊळगावमही) – नगदी १,७०० रुपये.
३. रवि सुधाकर शिंगणे (वय २९, रा. देऊळगावमही) – नगदी १,८५० रुपये.
४. योगेश प्रल्हाद घुडघे (वय ३०, रा. देऊळगावमही)
५. डिंगांबर प्रल्हाद भागीले (वय ४५, रा. टाकरखेड भागीले) – नगदी २,१५० रुपये.
६. परमेश्वर तुकाराम भागीले (वय ३५, रा. टाकरखेड भागीले) – नगदी १,९०० रुपये.
७. किसन संतोष सुर्यवंशी (वय २४, रा. देऊळगावमही) – नगदी १,९०० रुपये.
८. एकनाथ अशोक कायंदे (वय २८, रा. वायगाव खुर्द) – नगदी १,६५० रुपये.
९. संतोष प्रल्हाद भागीले (वय ४७, रा. टाकरखेड भागीले) – नगदी २,२५० रुपये.
१०. तुषार जालींदर खिल्लारे (वय २८, रा. देऊळगावमही) – नगदी २,०५० रुपये.
११. परमेश्वर पंढरीनाथ भागीले (वय २७, रा. टाकरखेड भागीले) – नगदी २,३०० रुपये.
१२. गणेश माधवराव भागीले (वय ३०, रा. टाकरखेड भागीले) – नगदी २,०५० रुपये.
१३. नितीन बबन खिल्लारे (वय ३५, रा. देऊळगावमही) – नगदी २,४०० रुपये.

एकूण जप्त मुद्देमाल:

आरोपींच्या अंगझडतीतील रोख रक्कम, जुगाराच्या डावावरील नगदी १,००० रुपये, ५० रुपये किमतीचे ५२ ताश पत्ते आणि बसण्यासाठी वापरलेली १०० रुपये किमतीची चटई असा एकूण २७,३५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी पंचांसमक्ष जप्त केला आहे.

या प्रकरणी २३ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ०४:०४ वाजता देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अप. नं. ३८७/२०२५, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची नोंद दाखल अधिकारी पोलीस अंमलदार ,विनोद गवई , यांनी केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (PSI) नितीन मिंड करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button