Uncategorized

आता पोरज गावाचा पावसाळ्यात संपर्क नाही तुटणार ; आ अँड फुंडकरांनी आणला पूल व संरक्षण भिंतीसाठी सव्वा सहा

आता पोरज गावाचा पावसाळ्यात संपर्क नाही तुटणार ; आ अँड फुंडकरांनी आणला पूल व संरक्षण भिंतीसाठी सव्वा सहा कोटी रु. चा निधी खामगाव ::–
स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

आ अँड आकाश फुंडकरांनी पोरज गावच्या पूल व संरक्षण भिंतीसाठी राज्य सरकारकडून तब्बल सव्वा सहा कोटी रुपये चा भरीव निधी मंजूर करून आणला आहे. खामगाव तालुक्यातील पोरज गावला लागून ज्ञानगंगा नदीवर छोटी मोरीचा पूल आहे. पावसाळ्यात धोडासाही मुसळधार पाऊस झाला की या मोरीवरून पाणी जाते. त्यामुळे या गावाचा संपर्क तुटतो. तसेच याच नदीवर काही अंतरावर निम्न ज्ञानगंगा प्रकल्प आहे. हा प्रकल्प दरवर्षी 100 टक्के भरतो. त्यामुळे सांडव्याचे पाणी सोडले की सुद्धा पाणी मोरीवरून जाते. त्यामुळे विद्यार्थी, व सर्वच गावाला मोठा त्रास होतो. कधी कधी चार पाच दिवस अंधारात ग्रामस्थांना काढावी लागत असायची. अखेर आ अँड आकाश फुंडकर यांनी मोठा पुल, पूर संवरक्षक भिंत व पोच रस्ता कामासाठी 6 कोटी 24 लाख रुपये एवढा भरीव निधी राज्य सरकार कडून मंजूर करून आणला आहे. त्यामुळे पोरज गावाची सर्वात मोठी समस्या आ अँड फुंडकर यांच्यामुळे निकाली लागली आहे. येणाऱ्या काही दिवसात या कामाला सुरुवात होणार आहे. पोरज गावच्या तसेच खामगाव खरेदी विक्री संस्थेच्या उपाध्यक्षा सौ गोदावरीताई पुरुषोत्तम ढोण यांचेसह सर्व पोरज ग्रामस्थांनी याबद्दल आ अँड आकाश फुंडकर यांचे आभार मानले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button