Uncategorized

शेतकऱ्यांना मिळणार अधिकाधिक सिंचन विहिरी, नव्याने होणार वस्तुनिष्ठ सर्वे,

*शेतकऱ्यांना मिळणार अधिकाधिक सिंचन विहिरी, नव्याने होणार वस्तुनिष्ठ सर्वे, विधानसभा सभागृहात आ अँड फुंडकरांच्या प्रश्नावर रोहयो मंत्रांनी दिली ग्वाही खामगाव ::-* स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे‌। खामगाव मतदार संघातील शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजने मार्फत विहिरी मिळणार आहेत, आ अँड आकाश फुंडकर यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर रोहयो मंत्री ना भुमरे यांनी ग्वाही दिली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे1. आज 19 जुलै रोजी आ अँड आकाश फुंडकरांनी रोहयो मार्फत होणाऱ्या सिंचन विहिरीचा प्रश्न विधानसभा सभागृहात उपस्थित केला. शेतकऱ्यांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न सभागृहात मांडताना आ अँड फुंडकर म्हणाले की खामगाव मतदार संघात पाणलोट क्षेत्रातील केवळ 27 गावांमध्येच रोजगार हमी योजने मार्फत शेतकऱ्यांना सिंचन विहिरी मिळतात. अनेक जाचक अटी व शर्थी असल्याने शेतकऱ्यांना विहिरी मिळत नाहीत. सर्वात मोठी चूक शासनाच्या GSD विभागाच्या चुकीच्या सर्वेक्षण मुळे झाली आहे. कृषी, जलसंधारण, तहसील आदी विभागाकडून माहिती मागितल्यानंतर प्रत्यक्षात गाव व शिवारात पाहणी करून सर्वे करायला हवा. परंतु हे सर्वेक्षण कार्यालयात बसून केल्या गेले असल्याचे आ अँड फुंडकर यांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा नव्याने वस्तुनिष्ठ सर्वे करावा, जाचक अटी रद्द कराव्या, अधिकाधिक शेतकऱ्यांना सिंचन विहिरी चा लाभ मिळावा जेणेकरून ते आर्थिक सक्षम होतील अशी मागणी प्रश्न उपस्थित करताना आ अँड फुंडकरांनी केली. याला सकारात्मक प्रतिसाद रोहयो मंत्री ना संदीपपाण भुमरे यांनी दिला. उत्तर देताना त्यांनी आ अँड फुंडकरांना नव्याने वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करणार , काही जाचक अटी रद्द करणार, आणि अधिकाधिक गावे या योजनेत बसतील , व मोठया प्रमाणात शेतकऱ्यांना रोहयो मार्फत सिंचन विहिरी देऊ अशी ग्वाही विधानसभा संभागृहात दिली. यावेळी रोहयो मार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सिंचन विहिरी चे अनुदान तीन लाखावरून चार लाख केल्याबद्दल आ अँड फुंडकर यांनी रोहयो मंत्री ना भुमरे यांचे सभागृहात अभिनंदन केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button