शांतता समिती मिटिंग पोलिस स्टेशन चिखली..

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस चिखली तालुका : प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे
चिखली
आज दिनांक 22 ऑगस्ट
2026 रोजी पोलीस स्टेशन चिखली हद्दीमध्ये पोलीस स्टेशन आवारात आगामी सण उत्सव ईद-ए-मिलाद चे अनुषंगाने चिखली शहरातील शांतता समितीची मीटिंग घेण्यात आली.
सदरची मीटिंग श्री निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली असून मा. श्री अमोल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा, श्री पंडितराव देशमुख नगराध्यक्ष नगरपरिषद चिखली यांची उपस्थिती होती. सदर मीटिंगमध्ये ईद-ए-मिलाद च्या काढण्यात येणाऱ्या मिरवणुकी संबंधाने मा पोलीस अधीक्षक साहेब व अपर पोलीस अधीक्षक साहेब यांनी मिरवणुकी दरम्यान डीजे चा वापर करू नये, आक्षेपार्ह घोषणा देण्यात येऊ नये, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करू नये, मिरवणुकी दरम्यान आक्षेपार्ह लिखाणचे बॅनर/फोटो वापरू नये व इतर सुरक्षितते संबंधाने सूचना देण्यात आल्या असून सदरची मिरवणूक ही कोणताही कायदा व सुव्यवस्था न होऊ देता शांततेत पार पाडून पोलिसांना सहकार्य करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
सदर मिटींगला शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील, मौलाना, पत्रकार बांधव , प्रकाश शिंदे, तसेच विशेष पोलीस अधिकारी स्वयंसेवक असे हजर होते



