बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शिंदे यांच्या निवासस्थानी खासदार प्रतापराव जाधव, डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा सत्कार; जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा : बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर बिनविरोध निवड झाल्याबद्दल बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि माजी कॅबिनेट मंत्री तथा विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा शिंदे यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रतापराव जाधव यांची सदिच्छा भेट झाली. तसेच शिवसेना संपर्कप्रमुख, विदर्भ विभाग आयुष डॉक्टर सेलचे नियुक्तीपत्र डॉ. विशाल शिंदे यांना प्रतापराव जाधव यांच्या हस्ते देण्यात आले.

महाराष्ट्र चिकित्सा आस्थापन विधेयक २०२६ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात तसेच जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी करणारे निवेदनही यावेळी देण्यात आले.

हर्षय सूर्यकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी सामाजिक परिवर्तन विचार मंचाचे सदस्य तसेच डॉक्टर असोसिएशन, देऊळगाव राजा येथील सदस्य उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button