बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शासकीय जमिनीवरील वृक्षलागवडीच्या चौकशीची मागणी तिव्हाण खुर्द येथील गट क्र. १३१ मधील जमिनीप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव तिव्हाण खुर्द येथील गट क्रमांक १३१ मधील सुमारे ९ हेक्टर ८१ आर शासकीय जमिनीवर कोणत्याही शासकीय योजनेची मंजुरी नसताना वृक्षलागवड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी तालुका अध्यक्ष, भूमी मुक्ती मोर्चा शेगाव विलास यशवंत पहुरकर यांनी केली आहे.
याबाबत जिल्हा परिषद बुलढाणा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे २१ ऑगस्ट २०२६ रोजी तक्रार अर्ज सादर करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, संबंधित जमीन शासकीय असून ती पूर्वीपासून तक्रारदाराच्या कुटुंबाच्या वहिवाटीत व ताब्यात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच महसूल अभिलेखात या जमिनीबाबत अतिक्रमणाची नोंद असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, १९८८ पासून सदर जमीन त्यांच्या कुटुंबाच्या वहिवाटीत असून या जमिनीबाबतचे वादप्रकरण शेगाव येथील न्यायालयात सुरू आहे. असे असताना कोणतीही कायदेशीर परवानगी किंवा प्रशासकीय मंजुरी नसताना संबंधित जमिनीवर वृक्षलागवड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या वृक्षलागवडीमुळे पिकांचे नुकसान करण्याचा तसेच तक्रारदाराच्या कुटुंबास
त्रास देण्याचा उद्देश असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व तातडीने चौकशी करून संबंधितांना योग्य आदेश देण्यात यावेत, तसेच झालेल्या कार्यवाहीची प्रत तक्रारदारास देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीची प्रत जिल्हाधिकारी बुलढाणा तसेच भूमी मुक्ती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे. आता प्रशासन या तक्रारीवश्न

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button