बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा संग्रामपूरची कार्यकारिणी सभा व नवीन सदस्यांचा जाहीर प्रवेश उत्साहात संपन्न……!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

संग्रामपूर:- २२ ऑगस्ट २०२६ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा संग्रामपूरची तालुका कार्यकारिणी सभा आज दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी संग्रामपूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, वरवट बकाल येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. सभेच्या निमित्ताने अनेक शिक्षकांनी संघटनेच्या कार्यावर विश्वास व्यक्त करीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघामध्ये जाहीर प्रवेश केला. ही सभा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यचिटणीस मा. श्री गौतमराव मारोडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व तालुका अध्यक्ष श्री श्याम कौलकार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्री सुधीर दाते, जिल्हा चिटणीस श्री प्रकाश हागे, सल्लागार श्री मिलिंद सोनोने व सरचिटणीस श्री अनिल धनभर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभेचे विशेष आकर्षण म्हणजे नवीन सदस्यांचा झालेला जाहीर प्रवेश. श्री मधुकर ढगे, श्री प्रकाश धामोडे, श्री निलेश गव्हांदे, श्री श्रीकृष्ण इघोकार, श्री गोपाळ ढगे व श्री श्रीधर धुर्डे , श्री बळीराम गायकी या शिक्षक बंधूंनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यावर विश्वास ठेवून संघटनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी सर्व मान्यवरांच्या हस्ते नवप्रवेशित सदस्यांचे पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत करण्यात आले तसेच त्यांचा सत्कार करून रीतसर संघटनेत प्रवेश देण्यात आला.मा. श्री गौतमराव मारोडे यांनी संघटनेची कार्यपद्धती याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी श्री सुधीर दाते, श्री मिलिंद सोनोने, श्री अनिल धनभर व श्री श्याम कौलकार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संघटनेची वाटचाल, शिक्षकांचे प्रश्न, संघटनेची भूमिका व भविष्यातील कार्यदिशा याबाबत त्यांनी मौलिक विचार व्यक्त केले. नवीन प्रवेशित सदस्यांच्या वतीने श्री मधुकर ढगे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्याबद्दल विश्वास व्यक्त केला. सभेचे प्रभावी सूत्रसंचालन श्री वसंत खंडारे यांनी केले, तर श्री भास्कर डोसे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सभेला तालुका कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सभेची सांगता सर्वांनी एकत्रितपणे स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेत केली.
नवीन सदस्यांच्या प्रवेशामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा संग्रामपूर अधिक बळकट झाली असून, शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटना अधिक ताकदीने कार्य करेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा संग्रामपूर…..✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button