बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

तहसील,नगरपालिका, ग्रामपंचायत मध्ये प्रमाणपत्रांची नोंद, मग ते बनावट कसे

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी….

प्रशासनाने दबावाखाली दाखल केले खोटे गुन्हे : राहुलभाऊ बोंद्रे

चिखली :  परमहंस  रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांविरुद्ध शासकीय कागदपत्रांची बनावट निर्मिती आणि फसवणूक केल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र चिखली तहसील, चिखली नगरपालिका, सावरगांव डुकुरे ग्रामपंचायत या तिन्ही कार्यालयातून रितसर प्रमाणपत्रे संस्थेने घेतली असून त्यांच्या सत्यप्रतीही संस्थेकडे उपलब्ध आहे.

शिवाय नगरपालिकेच्या जावक रजिस्टरमध्ये 11 जानेवारी 2013  ला 3554  क्रमांकाचे प्रमाणपत्र अनुराधा अभियंत्रिकी महाविद्यालयाला देण्यात आले आहे. चिखली तहसिलचे 1993 चे एनए प्रमाणपत्रही संस्थेकडे उपलब्ध आहे. सावरगाव डुकरेच्या माजी सरपंच यांनी तर जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रतिज्ञापत्र सादर करत बांधकाम आणि भोगवटा प्रमाणपत्र दिल्याचे सांगितले आहे. यावरुन जिल्हा प्रशासनाचा  कारभार चव्हाट्यावर आला असून तहसील,नगरपालिका, ग्रामपंचायत या तिन्ही कार्यालयात  प्रमाणपत्रांची नोंद, मग ते बनावट कसे ? असा संतप्त सवाल परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांनी केला आहे.

राहुलभाऊ बोंद्रे म्हणाले की, एसडीओच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या पडताळणी समितीने एकतर्फी चौकशी केली असून शासनाची दिशाभूल केली आहे. संस्थेची कुठलीही बाजू समितीने ऐकून घेतली नाही. परस्पर बनावट आणि खोटा अहवाल सादर करुन शासनाची नाचक्की केली आहे.

खुद्द सावरगाव डुकरेच्या माजी सरपंच सौ. मीरा विष्णू पाटील डुकरे यांनी 2013  मध्ये अनुराधा अभियंत्रिकी महाविद्यालयाला  प्रमाणपत्र दिल्याचे प्रतिज्ञालेखाद्वारे जाहीर केले आहे. तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी खोटा पडता

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button