Uncategorized

२० वर्षीय विद्यार्थिनीला बसला २१ लाखांचा फटका

जळगाव स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

| ९ जुलै २०२४

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफ्याचे अमिष दाखवत चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील विद्यार्थिनीची २१ लाख सात हजार ४५६ रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील २० वर्षीय वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनीला साक्षी सिंग नाव सांगणाऱ्या तरुणीने टेलिग्रामवर एक लिंक पाठविली. तसेच या विद्यार्थिनीला एका व्हाटसअॅप ग्रुपवर जॉईन केले व एका व्हाटस् क्रमांकावरून बँक खात्याची माहिती तिला पाठविली. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त नफा होईल, असे अमिष दाखवत १७ मे ते ७ जुलै या दरम्यान तिच्याकडून वेळोवेळी एकूण २१ लाख सात हजार ४५६ रुपये स्वीकारले. एवढी रक्कम देऊनही मोबदला मिळत नसल्याने तसेच मुद्दल रक्कमही गेल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या तरुणीने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून फसवणूक करणाऱ्या तिघांविरुद्ध बीएनएस ३१८ (४), ३(५) यासह माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक एम. एम. कासार करीत आहेत. या फसवणुकीमध्ये सायबर ठगांनी बँक खात्याची माहिती देऊन या तरुणीकडून आरटीजीएस, एनईएफटीद्वारे रक्कम स्वीकारली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button