Uncategorized

एलसीबीची कारवाई : गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजविणारा अटकेत

जळगाव स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

| १३ जुलै २०२४जामनेर शहरातील दामले प्लॉट भागामध्ये गावठी बनावटीचा पिस्तूल हातात घेऊन दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल हस्तगत केले आहे. पुढील कारवाईसाठी त्याला जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस मुख्यालयातील जनसंपर्क कार्यालयाने शनिवारी 13 जुलै रोजी दुपारी एक वाजता दिलेल्या प्रचिती पत्रकान्वये कळविले आहे. निलेश प्रल्हाद मोरे, वय २३, रा. दामले प्लॉट, जामनेर असे संशयित आरोपीचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर शहरातील दामले प्लॉट भागामध्ये शुक्रवारी 12 जुलै रोजी रात्री आठ वाजता जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक रणजीत जाधव हे पेट्रोलिंग करत असताना परिसरात संशय आरोपी निलेश मोरे हातात गावठी बनावटीचा पिस्तूल घेऊन दहशत माझे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती दिली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार, पोलीस कॉन्स्टेबल कमलाकर बागुल, पोना रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, भारत पाटील यांनी कारवाई करत संशयित आरोपी निलेश प्रल्हाद मोरे वय 23 राहणार दामले प्लॉट परिसर जामनेर याला अटक केली त्याच्याकडून गावठी बनावटीचा पिस्तूल जप्त केला आहे याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस मुख्यालयातील जनसंपर्क विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकान्वये दिले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button