जळगावा जिल्हानिधन

सामाजिक कार्यकर्ते हर्षल तिवाणे यांचे निधन !

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

जळगाव प्रतिनिधी प्रमोद सोंदडे

२६ मार्च शहरातील मारोती पेठ जुने जळगाव येथील रहिवाशी हर्षल रविंद्र तिवाणे (वय २६ वर्ष) यांचे दि २५ मार्च रोजी ह्र्दयविकराच्या झटक्याने निधन झाले असुन त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार दि. २६ मार्च २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता नेरीनाका वैकूँठधाम येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहीण, काका, काकू असा मोठा परिवार होय.जुने जळगाव येथील दुर्गोत्सव, युवा मारुती पेठ गणेश मंडळ तसेच डेब्युजी फोर्स युवा ब्रिगेडमध्ये त्यांनी विविध पदांवर जबाबदारी पाहिली होती. हर्षल याच्या पश्चात आई, काका, काकू, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या मंगळवार दि.२६ मार्च रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरून निघणार असून नेरी नाका स्मशानभूमी या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. हर्षलच्या वडिलांचे दोन वर्षापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असून आज हर्षलच्या निधनाने संपूर्ण तिवाणे परिवार, समाजबांधव, मित्र परिवार आणि समाजमन सुन्न झाले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button