खानदेशगुन्हेगारीजळगावा जिल्हा

पहाटेचा थरार : चाकूचा धाक दाखवत ९० लाखांचे सोने लुटले

जळगाव स्टार भारत लाईव्ह

| २४ मार्च २०२४राज्यातील अनेक महामार्गावर गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच शहादा तालुक्यातील बोरद बायपास रस्त्यावरील तऱ्हाडी ते ठेंगचे गावा दरम्यान अज्ञात दरोडेखोरांनी पिस्तूल, चाकूचा धाक दाखवून सुमारे ९० लाख रुपये किमतीचे एक किलो तीनशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व सोने लुटल्याची घटना घडली. मुनीम व ड्रायव्हर या दोघांना दरोडेखोरांनी शिंदखेडा शहरापर्यंत आपल्यासोबत नेले व तेथून ते फरार झाले. या घटनेने सराफा व्यावसायिकांत भीती आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी १० वाजता येथे संजय सोनार यांच्या मालकीच्या पार्थ ज्वेलर्समधून त्यांचे मुनीम विलास बर्डे, रा.टवळाई, चालक प्रकाश कापुरे हे नेहमीप्रमाणे कार(क्र.एमएच ३९ जे ८१३८)ने तळोदा, अक्कलकुवा, खापर या ठिकाणच्या व्यापाऱ्यांना सोेने व दागिने देण्यासाठी निघाले. तळोद्यास जाण्यासाठी ते नेहमीच्या पिंगाणे मार्गे बोरद बायपास रस्त्याने निघाले. साडेदहा वाजता तऱ्हाडी ते ठेंगचे या गावादरम्यान वळणावर एक काळ्या रंगाची बनावट नंबरची इको स्पोर्ट गाडीने त्यांच्या वाहनाला अडवले. त्या गाडीतील चौघांपैकी तिघांनी खाली उतरून मुनीम विलास याला दार उघडण्यास सांगून त्याच्या कानाला पिस्तूल लावून धमकावत गाडीबाहेर काढले.यानंतर ते तिघे गाडीत बसले मुनीम विलास व चालक प्रकाश यास गाडीत मागे बसवून शहादा शहराला वळसा घालून जाणाऱ्या लोणखेडा बायपास मार्गाने ते सर्वजण शिंदखेडा येथे पोहोचले. तेथे त्या तिघांनी या दोघांना गाडीतून उतरवले. त्यांच्या जवळील मोबाइलमधून सिम कार्ड काढून घेत या घटनेची वाच्यता करू नका, अन्यथा गाठ आमच्याशी आहे असा दम देत त्यांच्या गाडीच्या टायरची हवा काढून त्यांच्या मागून येणाऱ्या काळ्या रंगाच्या गाडीत बसून चौघे फरार झाले. मुनीम व चालक दोघे दुपारी एक वाजता शहाद्यात पोहोचले. आणि मालक संजय सोनार यांना लूट झाल्याचे व घटनाक्रम सांगित ला. त्यांनी याबाबत लगेच नातेवाइकांसह व्यापारी व सराफा असोसिएशन यांच्यासह येथील पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंतांना माहिती दिली. तत्काळ नाकाबंदी केली. मात्र यश आले नाही. रात्री उशिरापर्यंत येथील पोलिसांत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button