सामाजिक

नगर परिषदे विरोधात राष्ट्रीय हरीत लवाद न्यायाधिकरणात जाऊ : गोपाल तायडे.

म्हाडा कॉलनी टॉयलेट चेंबर मेनहोल जोळणी चे प्रकरण.

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलढाणा जिल्हा ग्रामिण प्रतीनीधी ऋषिकेश देठे

नगर परिषद शेगाव यांना निवेदना द्वारे डॉ. अण्णा भाऊ साठे येथील चेंबर मेनहॉल मध्ये जोळणी करण्या करीता. माघील दोन ते तीन वर्षा पासून
पाठपुरावा करण्यात येत आहे.
नगर परिषदे कडून कोणत्याच प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याने.
गोपाल तायडे यांच्या कडून महाराष्ट्र प्रदूषण मंडळ अकोला यांना या बद्दलची माहिती देऊन रीतसर तक्रार देण्यात आली. त्या मुळे प्रदूषण विभागा कडून दि. 11/10/2023 रोजी नगर परिषद शेगाव यांना डॉ. अण्णा भाऊ साठे नगर येथील चेंबर मेनहॉल जोळणी संदर्भात पत्र देण्यात आले. व तक्रार कर्त्यांना या बद्दल माहिती द्यावी असे पत्रा असे ही सांगण्यात आले. तरी सुद्धा नगर परिषद कडून म्हाडा कॉलनीतील चेंबर व्यवस्थापण करण्यात आले नाही. त्या उलट जाणीव पर्वक दिशाभूल करून. हे काम जीवन प्रादिकारण विभाग ( M.J.P.) आहे असे सांगण्यात आले व तसे पत्र दि.23 /11/2023 नगर परिषद शेगाव. कडून गोपाल तायडे यांना देण्यात आले. मिळालेल्या पत्रा संदर्भात M.J.P. विभागाला संपर्क केला असता त्यांनी ही तक्रार कर्त्यानां पत्र देऊन हे काम M.J.P. विभागाच्या नसून नगर परिषद शेगाव यांचे आहे. असे पत्र दि.19/1/2024 दिले त्या मुळे नगर परिषद शेगाव डॉ. अण्णा भाऊ साठे येथील चेंबर मेनहॉल जोळणी संदर्भात उदासीन असून मोठया प्रमाणात दिशा भूल करीत आहे. सदर चेंबर मेनहोल जळणी अत्यंत आवश्यक आहे. अत्यन्त मोठया प्रमाणात घाण या चेंबर बाहेर येत आहे. त्या मुळे मोठया प्रमाणत प्रदूषण ही होत आहे. अश्यातच तेथील नागरिकांचे आरोग्य, जीवनमान धोक्यात आले आहे. वारंवार निवेदने, तक्रारी, आंदोलने, करून ही समस्याचे निवारण नगर परिषद करीत नसल्याने
नगर परिषदेच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्तित होत आहे. लवकरात लवकर उद्धभवलेल्या समस्याचे निराकारण करावे अन्यथा नगर परिषद शेगाव विरोधात सर्व पुराव्यानिशी राष्ट्रीय हरीत लवाद न्यायाधिकरणात जाऊ असा ईशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी दिला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button