सामाजिक

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ शेगाव अंतर्गत पत्रकार सन्मान सोहळामा राजेशजी राजोरे (देशोन्नती) यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलढाणा जिल्हा ग्रामिण प्रतीनीधी ऋषिकेश देठे

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ ही संघटना देशात अनेक राज्यांमध्ये कार्यरत आहे गेल्या अनेक वर्षापासून संस्थेचे केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख केंद्रीय व राज्य कार्यकारणी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सतत लढा देत आहे पत्रकार हा देशाचा चौथा आधारस्तंभ आहे पत्रकाराला कोणत्याही प्रकारचे वेतन नसून तो जाहिरातीच्या तुटपुंज्या वेतनावर एक प्रकारचे देशसेवेचे काम करत असतो पत्रकार हा देशातील संसद व्यवस्था न्यायव्यवस्था व प्रशासन या तिन्ही व्यवस्थेवर लक्ष ठेवून त्याचे प्रतिबिंब जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम पत्रकार करतो करिता अशा पत्रकारांचा सन्मान होणे ही काळाची गरज आहे याच अनुषंगाने अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ शेगाव तालुका व शहर च्या वतीने दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी पारिजात विद्यालय मनसगाव येथे पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे तसेच या कार्यक्रमात सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्याच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे
सदर कार्यक्रमाचे उद्घाटक संदीप दादा शेळके अध्यक्ष राजश्री शाहू परिवार व संकल्पक वन बुलढाणा मिशन हे आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री संजय भाऊ कुटे आमदार जळगाव जामोद विधानसभा
तसेच कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून मा श्री राजेश जी राजोरे साहेब बुलढाणा आवृत्ती संपादक देशोन्नती तसेच मुख्य प्रमुख पाहुणे मा अशोक भाऊ सोनोने पार्लमेंटरी बोर्ड सदस्य तसेच विशेष उपस्थितीमध्ये मा श्री कैलास बापू देशमुख महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ तसेच अभिमन्यूजी भगत केंद्रीय सदस्य ,बाबाराव खडसे केंद्रीय कार्यालय प्रमुख ,अनुप गवळी जिल्हाध्यक्ष बुलढाणा, रामेश्वर गायकी जिल्हा कार्याध्यक्ष बुलढाणा, अश्विन राजपूत जिल्हा संघटक बुलढाणा,अमोल भगत अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा संपर्कप्रमुख बुलढाणा,
तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्रसन्नजीत पाटील राष्ट्रवादी नेते, स्वातीताई वाकेकर काँग्रेस नेत्या,
सौ सुषमाताई नितीन शेगोकार माझी न, प उपाध्यक्ष , कल्पनाताई म्हसणे भाजपा नेत्या,
मा शांताराम दाणे शिवसेना नेते (शिंदे गट) सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वरवट बकाल, प्रीतीताई शेगोकार माजी नगरसेविका, सौ सविताताई झाडोकार काँग्रेस नेत्या, विजुबापू देशमुख सहकार नेते, प्रशांत डिक्कर शेतकरी संघटना नेते , संजूभाऊ तिबडेवाल प्रतिष्ठित व्यापारी, डॉक्टर शबनम शेख काँग्रेस नेत्या ,आदींची प्रमुख उपस्थिती आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार समाधान सोनवणे बीडिओ सतीश देशमुख , मुख्याधिकारी जयश्री बोराडे (काटकर ) ,कुमारी एच,डी ,वायदंडे गटशिक्षणाधिकारीशेगाव ,प्रकाश देशमुख अध्यक्ष मातोश्री शिक्षण संस्था कौलखेड, महेश गायकवाड कृषी अधिकारी शेगाव, एस एस खुणे सर मुख्याध्यापक पारिजात विद्यालय मनसगाव, सुनील आंबुलकर ठाणेदार शेगाव शहर, दिलीप वडगावकर ठाणेदार शेगाव ग्रामीण, भारत भाऊ कंकाळ अध्यक्ष शाळा समिती पारिजात विद्यालय मनसगाव ,गजानन देशमुख उपाध्यक्ष शाळा समिती पारिजात विद्यालय मनसगाव यांची प्रमुख पाहुणे तर मार्गदर्शक उमेश भाऊ सिरसाट,पत्रकार सचिन कडूकार अध्यक्ष डिजिटल मीडिया परिषद शेगांव म्हणून उपस्थिती राहणार आहे तसेच सत्कारमूर्ती मध्ये समस्त शेगाव पत्रकार व बुलढाणा जिल्हा पत्रकार असुन विशेष सत्कारांमधील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे
पत्रकार सचिन कडोकार यांना शोध पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे
तसेच रोहित मोर्डे सर अकोला यांचा मनोरंजनाचा संगीतमय कार्यक्रम राहणार आहे सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल भगत सर प्रशांत देशमुख सर तर आभार देवचंद्र समदुर करणार आहेत ,पत्रकार सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाला आपण साक्षीदार असावेत करिता हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ शेगाव तालुका अध्यक्ष देवचंद्र समदुर, मार्गदर्शक उमेशभाऊ शिरसाट श्रीकांत कलोरे, दिनेश घाटोळ, सागर शिरसाट, उमेश राजगुरे,गौतम इंगळे, ऋषिकेश देठे, अक्षय सावदेकर यांनी केले आहे.

चौकट – मा.श्री राजेश जी राजोरे बुलढाणा आवृत्ती संपादक दैनिक देशोन्नती यांना , त्यांच्या चाळीस वर्षाच्या दीर्घ खडतर प्रवासातून उत्कृष्ट व आदर्श पत्रकारिते करिता त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button