महाराष्ट्रविदर्भ

राष्ट्रीय लोक अदालती मध्ये आपले वाद मिटवा! वेळ व पैसा वाचवण्याचे केले आवाहन! आज राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे प्रतिनिधी

तेल्हारा : राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आपले वाद मिटवल्याने वेळेची व पैशाची बचत होते व आपले वाद कायमस्वरूपी मिटवल्या जातात. विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नई दिल्ली.तथा राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशाने
अकोला जिल्हा न्यायालय . कामगार न्यायालय. कौटुंबीक न्यायालय तथा सर्व तालुका न्यायालय येथे मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती सुवर्णा केवले यांच्या आदेशाने तसेंच श्री योगेश पैठणकर सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अकोला यांच्या मार्गदर्शना खाली दिनांक ९/१२/२०२३ शनिवार रोजी सकाळी १० : ३० ते ५ :३० च्या दरम्यान राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालत मध्ये अपघातांचे दावे. बॅंकेचे वाद. जागेचे वाद. शेती वाद. भुसंपादन . विमा कंपन्यांनचे वाद. कौटुंबिक वाद. टैक्स संबंधीत वाद. नळ बिल. इलेक्ट्रीक बिल . इत्यादी प्रकार चे वाद या लोक अदालत मध्ये कायम स्वरूपी मिटवले जातात तरी या लोक अदालत चा फायदा संबंधीत सर्व नागरीकांनी घ्यावा कारण यामध्ये वेळेची तसेच पैसाची बचत होते. त्याच प्रमाणे आपसातील वाद कायम स्वरूपी मिटतात त्यामुळें सर्व नागरीकांनी या लोक अदालत चा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती सुवर्णा केवले तसेंच श्री योगेश पैठणकर सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अकोला यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button