खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्ररावेर

रावेर तालुक्यात पुन्हा दारू – पत्ता , सट्याचा धुमाकुळ प्रशासन मात्र मौनात नागरिकांमध्ये संताप ?

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
ता प्रतिनिधी :
विनोद तायडे

रावेर तालुक्यातील . खेडोपाडी , गावोगावी व ठिकठिकाणी आणी रावेर शहर परिसरामध्ये अवैधरित्या दारू व पत्त्याचे व सट्याचे अड्डे मोठ्या प्रमाणात सुरू असुन हे धंदे अक्षरशा जोमात चालत आहेत दिवसाढवळ्या अवैध धंधांची उघड विक्री होत असतांना सुद्धा मात्र पोलिस प्रशासन व दारूबंदी विभागाचे अधिकारी याकडे डोळे झाक करीत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे . यामुळे परिसरातील तरुणाई तसेच अल्पवयीन मुलेही या अवैध धंद्याच्या आहारी जाऊ लागली आहेत . सामाजिक स्तरावर याचे गंभीर परिणाम दिसुन येत असुन नागरीकांच्या मनामध्ये संतापाची लाट पसरली आहे व तसेच शहरामध्ये दारुची सर्रास विक्री होत असल्या चे धक्कादायक वास्तव समोर आले आहे आणि संपुर्ण तालुक्या मध्ये ठीकठीकाणी अशा प्रकारे दारू विक्री होत असणे हे केवळ कायद्याला झुगारून देणेच नव्हे तर समाजाच्या ढासळत्या स्थितीचे स्पस्ट चित्र आहे तसेच संपूर्ण तालुक्यात अशा किती ठिकाणी हे अड्डे सुरू आहेत याचा मागोवा घेतल्यास आकडेवारी भयावह असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे

नागरीकांचा प्रशासनाला सवाल ?

लोकांच्या आरोग्याशी व भावी पिढीच्या भवितव्याशी खेळणारे हे धंदे थांबविण्यासाठी पोलिस व दारुबंदी प्रशासन काय कारवाई करणार ? या अडड्यांना आळा घालून जबाबदारांवर कठोर कारवाई केली जाणार की नाही या प्रश्नांची उत्तरे मिळे पर्यन्त नागरीकांचे लक्ष प्रशासनाकडे लागले आहे

सामाजिक हानी गंभीर …….

दारू व जुगारामुळे केवळ कुटुंबाची आर्थिक हानीच नाही तर गुन्हेगारी प्रवृतीला खतपाणी मिळत असल्याचे स्थानिक नागरीकांचे म्हणणे आहे ” आज या धंद्यांमुळे अनेक घरांची उध्वस्त स्थिती निर्माण झाली आहे मुले व युवापीढी ही दिवसनदी वस व्यसनाधिन होत आहेत तरीही प्रशासन निष्क्रीय आहे हिच खरी खंत आहे असे ग्रामस्थांनी संतापाने व्यक्त केले आहे

कारवाईची मागणी ……

गावोगावी अशा प्रकारे चालणाऱ्या अवैध धंद्यांना आळा बसणे गरजेचे आहे तसेच प्रशासनाच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्था कायम ठेवली जाते परंतु हे अवैध धंदे संपूर्ण तालुकाभर सुरु आहे यावरुण असे समजले जाते की कायदा व सुव्यवस्थेचे कुठेतरी उलंघन होत आहे तरी सुद्धा प्रशासन जाणुन – बुजून डोळे झाक करीत आहे
तरी लवकरात लवकर हे अवैध रीत्या चालणारे हे धंदे बंद न झाल्यास जनतेचा पोलिस प्रशासन यांच्यावर असलेला भरवसा व विश्वास हा हवेला स्पर्श होत राहील असे चर्चेला उधान आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button