कृषी दूतांनी दिले आधुनिकतेचे धडेडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय जळगाव (जा.)

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
येथील सातव्या सत्राच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत सुनगांव येथील गावकऱ्यांना पशू व दुगधव्यवसाय निगडीत माहिती दिली तसेच त्या संबंधित अँप कश्या हाताळाव्यात हेही सांगीतले. कामधेनु गोशाळा,पशुपालन ॲप ,काऊ मास्टर ॲप आणि अमोल पशु आहार अँपचा वापर करून शेतकयांना स्वतः घरबसल्या पशुधनाची आधुनिक माहिती मिळावी त्याचा त्यांना दैनंदिन व्यवस्थापनात उपयोग व्हावा व जनावरांची निगा कशी राखावी व त्यांचे व्यवस्थापन कसे करावे, बद्दल माहीती दिली यासाठी प्रा. योगेश गवई सर ,कार्यक्रम
अधिकारी श्री. अविनाश आटोळे सर, कार्यक्रम समन्वयक कु. विद्या कपले मॅडम, व महाविद्यालयातील पशु विज्ञान आणि दुग्धशास्त्र विषयाचे प्राध्यापिका कु. निम्रता खिरोडकार मॅडम यांचे सुद्धा मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी मकरंद सांगळे, प्रणव राखोंडे,प्रतिक राजुसकर,प्रथमेश राऊत,कुटुंबीय अद्धागतला या सर्व कृषी दूतांचा समावेश होता.



