जुने भांडणावरून तक्रारीवरून पोलिसांत परस्पर विरोधात गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव । शहरातील मोदीनगर येथे शेजारी राहणा-यांनी एकमेकाविरूध्द शेगाव शहर पो.स्टे.ला रिपोर्ट दाखल केला असून पोलिसांनी तक्रारीवरून परस्पर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी कैलास रामदास चव्हाण, वय ४० वर्षे रा. मोदीनगर शेगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फिर्यादी व आरोपी यांचे जुने भांडण असून नेहमी वाद होत असतात, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता सुमारास फिर्यादी कामानिमित्त फुलाची पिशवी घेऊन फियादीचे दुकानाकडे जात असताना फिर्यादीचे घरासमोर राहणारे सुनिल वासुदेव जाधव याने जुने भांडणाचे कारणावरून फिर्यादीला शिवीगाळ करायला सुरूवात केली. त्यावरून फिर्यादी याने त्यास मला शिवीगाळ का करतो असे महटले असता तेथे हजर असलेले प्रल्हाद नागोराव क्षीरसागर, वासुदेव कृष्णाजी जाधव दोन्ही रा. मोदीनगर यांनी फिर्यादीला कारण नसालाना पकडून ठेवून सुनिल वासुदेव जाधव याने रस्त्याच्या बाजूला पडलेला लोखंडी रॉड उचलून फिर्यादीचे डोक्यात, मागच्या बाजूस व पाठीवर मारून जखमी केले. डोक्यातून रक्त निघाले तेव्हा फिर्यादीची मुलगी कु. सृष्टी ही भांडण सोडविण्यासाठी आली असता तिला आरती जाधव हिने लोटून दिल्याने ती खाली पडली व पायाला दुखापत झाली. तसेच फिर्यादीला शिवीगाळ केली. याशिवाय उपरोक्त तिघांनी मिळून चांगले राहा आमच्या नादी लागले तर जीवाने मारून टाकू अशी धमकी दिली. तरी संबंधितांवर योग्य कारवाई व्हावी, अशा फिर्यादीचे रिपोर्टवरून व
मेडीकल सर्टिफिकेटवरून कलम ३२६, ३२३, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास पोउपनि काटकाडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
तर दुसन्या बाजूने फिर्यादी ३० वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी कैलास रामदास चव्हाण, रामेश्वर रामदास चव्हाण, वैशाली कैलास चव्हाण, ज्योती रामेश्वर चव्हाण सर्व रा. मोदीनगर शेगाव यातील फिर्यादी यांचे शेजारी राहणारा आरोपी कैलास रामदास चव्हाण हा नेहमी फिर्यादीकडे वाईट नजरेने पाहत असतो व नेहमी फिर्यादीचा पाठलाग करीत असतो. फिर्यादी हिने ही गोष्ट तिचे पतीला सांगिल्याने याबाबत दोन्ही गटामध्ये नेहमी वाद होत असतात.
२६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता सुमारास घटनेतील आरोपी कैलास रामदास चव्हाण याने
फिर्यादीच्या घरी कोणी नसताना फिर्यादीला वाईट उद्देशाने हात धरून ओढले, त्याने ओढल्याने फिर्यादीचे
डावे हाताला खरचटले आहे. त्यावेळी फिर्यादीने आरडाओरड केली असता त्याने फिर्यादीला लोटुन दिले व
घराबाहेर गेला. फिर्यादी आरडा ओरडा करत घराबाहेर आली असता फिर्यादीचे पती, सासु व सासरे यांनी
कैलास रामदास चव्हाण यांस तु असे का केले? असे विचारले असता आरोपीने शिवीगाळ सुरू केली.
तेवढ्यात तेथे आरोपी रामेश्वर रामदास चव्हाण, वैशाली कैलास चव्हाण, ज्योती रामेश्वर चव्हाण हे आले व
त्यांनी सुद्धा तुम्ही कैलास सोबत भांडण का करत आहे असे म्हणून शिवीगाळ करून लोटपाट केली व
फिर्यादीचे पती यांना जीवाने मारण्याची धमकी दिली. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून कलम ४५२, ३५४,
३५४ अ. ३५४ ड, ३२३, ५०४, ५०६, ३४ भा. द. वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा
तपास पोना निलेश गाडगे हे करित आहेत.



