अवैध देशी दारू जप्त; एकावर गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव काशेलानी पेट्रोलपंपाजवळ अवैधरित्या देशी दारू बाळगल्याच्या आरोपावरून शेगाव शहर पोलिसांनी गणेश गोपाळ शेळके (वय २७, रा. रोकडिया नगर, शेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. या वेळी आरोपीच्या ताब्यातून टेंगो पंच कंपनीच्या ९० मिली मापाच्या, कंपनी सीलबंद देशी दारूच्या १४ बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त दारूची किंमत ५६० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी शेगाव शहर पोलिस ठाण्यात कायम अप.नं. ५२५/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोहेकॉ गजानन प्रल्हाद वाघमारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ गाडगे करीत आहेत



