खानदेशजळगावा जिल्हा

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादनडॉ.उल्हास पाटील व डॉ.केतकी पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

रणधीर पवार

जळगाव – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात मंगळवार दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली.तसेच स्व. इंदिरा गांधी पुण्यतीथी निमीत्‍त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्यासह सदस्या डॉ.केतकीताई पाटील यांच्याहस्ते सरदार वल्ल्भभाई पटेल व स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रेमचंद पंडित, डॉ.सुभाष बडगुजर, प्रा.एन.जी.चौधरी, मानसोपचार तज्ञ डॉ.विलास चव्हाण, डॉ.विकास गायसमुद्रे, डॉ.सौरभ, डॉ.आदित्य जैन, बांधकाम विभागाचे परेश पाटील आदि उपस्थीत होते. याप्रसंगी मान्यवरांनी सरदार लोहपुरुष यांच्या कार्याचे स्मरण केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button