मराठा क्रांती मोर्चाचेआंदोलन

मराठा क्रांती मोर्चाचे
आंदोलन
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकर
दि. 12 सप्टेंबर रोजी शेगाव शहर व तालुक्यातील सर्कल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीकरिता व जालना तालुक्यातील अंतरवाली सराटी या गावात आमरण उपोषण करित असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मराठा समाजातील बांधव मराठा क्रांती मोर्चाच्या बॅनरखाली घंटानाद आंदोलन करणार आहेत.
स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन केले जाणार आहे. सकाळी ९ वाजता छ. शिवाजी महाजांच्या पुतळ्याला हारार्पण करून या आंदोलनाला सुरूवात होईल. त्यानंतर दिवसभर हे आंदोलन सुरू राहील. सायंकाळी ६ वाजता या आंदोलनाची सांगता होईल. तरी शेगाव शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे



