चिखली ७ सप्टेंबरला विदर्भातील मोठी दहीहंडी! पाच लाख 11 हजार 111 रुपयांची बक्षिसे! आ. आयोजन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
आ शेताताई महाले यांच्या संकल्प कनेतून दरवर्षी आयोजित केली जाणारी विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी यंदा सात सप्टेंबर रोजी चिखली येथे मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे. यावेळी पाच लाखाहून अधिक रकमेच्या बक्षिसांची लूट केली जाणार आहे. या दहीहंडीच्या प्रचार चित्राचे आवरण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते २ सप्टेंबर रोजी करण्यात आले.
भाजपाच्या कार्यकर्ता संवाद मिळाव्याला संबोधित करण्यासाठी बावनकुळे चिखली येथे आले असता त्यांनी आ. श्वेता ताई महाले यांच्यासह पक्षाच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत व शेकडो कार्यकर्त्यांच्या साक्षीने या दहीहंडीच्या प्रचार चित्राचे अनावरण त्यांनी श्वेता ताई महाले यांच्या माध्यमातून चिखली मतदारसंघात होणारा होणारा विकास व राबवले जाणारे राबवले जाणारे सांस्कृतिक उपक्रम अतिशय उपयुक्त असल्याचे प्रतिपादन आ. बावनकुळे यांनी यावेळी केले.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ७ रोजी दुपारी ३ वाजेपासून या दहीहंडी
उत्सावाला सुरुवात श्वेता ताई महाले यांच्या मार्गदर्शनात भाजपा युवा मोर्चाच्या वतीने या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. शाजान पदमसी. श्रुती मराठे आणि इशा केसकर टीव्ही स्टार अभिनेत्रीच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा दहीहंडी उत्सव आयोजित केला आहे. या उत्सवात भाग घेणाऱ्या मंडळांना एकूण ५ लाख ११ हजार १११ रुपयांची बक्षिसे आयोजकांच्या वतीने देण्यात येणार आहेत.



