बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

खामगाव बस स्थानक बनलेय चोरट्यांचा अड्डा! बस स्थानकावर एकाचे पाकीट, दुसऱ्याचा मोबाईल लांबवला! पोलिसांनी तिघांना पकडली..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी

उषा इंगळे बुलढाणा

खामगाव बस स्थानकावर सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरटे हात साफ करतात. असाच प्रकार पुन्हा समोर आला आहे. एका प्रवाशाचे पाकीट तर एकाचा मोबाईल लंबा झाल्याची घटना शनिवारी घडली होती. दरम्यान पोलिसांनी तपासचक्र फिरवीत काही तासातच बस स्थानक परिसरातून तीन चोर ज्यांना अटक केली.

येथील बस स्थानकावर गौरव वसंतराव बोरे (वय 34) या. शेंदुर्जना घाट जि. अमरावती हे २ सप्टेंबर 23 रोजी दुपारी ३ वाजून २३ वाजताच्या सुमारास बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या खिशातील पाकीट लंपास केले. त्यामध्ये २ हजार सातशे रुपये रोख व महत्त्वाची कागदपत्रे होती. तर दुसरे प्रवासी शे. फरजान शे. इब्राहिम यांच्या खिशातील १० हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला. दोन्ही प्रकरणी शिक्षक गौरव बोरे यांनी शहर पोस्टला फिर्याद दिली. फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध बांधविकलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आणि तपास चक्रे फिरवली असता डीबी पथकाने बसस्थानकावरून समीर खान मजिद खान (वय 34) रा. जळगाव खान्देश, शेख सजाद शेख अजगर (वय 21) व मो. इसाइल न्याहल अहमद(३७) दोघे रा. भुसावळ या तिघांना अटक केली. यांच्याकडून पाकीट जप्त केले असून सदर पाकिटात २७०० रुपये रोख तसेच एटीएम कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड कसे महत्त्वाचे कागदपत्र आढळून आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button